Nashik Road Damage: गेल्या वेळी ठेच अन तरीही यंदा तेच! शहरातील रस्त्यांची वाट झाली बिकट

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik Road Damage : गेल्या पावसाळ्यात पावसामुळे निकृष्ट रस्त्यांचे पितळ उघडे पडले. परिणामी रस्त्यांच्या दर्जावरुन हा विषय न्यायालयात गेला.

रस्त्याच्या दुरवस्थाविरुद्ध याचिका दाखल झाली, पण यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरावस्थेचा विषय नसला तरी, अनेक रस्त्यांचे कामच सुरू असल्याने यावेळी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गेल्या वेळी न्यायालयात तक्रार झाल्याची ठेच लागली असतानाही महापालिका प्रशासनाला कितपत शहाणपण येईल, ही शंकाच आहे. (roads in city damaged Chance of inconvenience during monsoon construction department nmc nashik)

गतवर्षीच्या पावसात सहाशे कोटींच्या रस्त्यांचे डांबर पावसात वाहून गेल्याचा अनुभवाकडे डोळेझाक करत मनपा बांधकाम विभागाने यंदाही दिडशे कोटीचे डांबर पाण्यात घालण्याची तयारी केली की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे.

गॅस पाइपलाइनसाठी शहरभर खोदलेले ११३ किमीच्या रस्त्यांपैकी ७३ किमी रस्त्यांवर खडीकरण, तर ५० किमी रस्त्यावर डांबरीकरण झाले आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरवात झाली आहे.

तर खडीकरण झालेले रस्ते खचत आहे. वास्तविक शहरात पावसाचे प्रमाण अजून खूपच कमी आहे. जेमतेम पावसातच शहरातील रस्त्यांची अशी दुरवस्था होत असल्यास, गेल्या वेळच्या तक्रारीपासून महापालिकेने काय बोध घेतला, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC School Uniform: विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाची प्रतीक्षा! लेखा विभागाच्या निर्णयामुळे ओढवली वेळ

पावसावर खापर

पावसाचा जोर वाढला म्हणजे, रस्त्याची दुरवस्था होते. ऐन पावसाळ्याच्‍या तोंडावर डांबरीकरण उरकल्यानंतर निकृष्ट रस्त्यांच्या पापाबाबत पावसाकडे बोट दाखवीत डांबरीकरणातील ‘डांबरट’ पणा दुर्लक्षित केला जातो.

शहरभर २४७ किलोमीटर रस्त्यांवर कामापैकी पहिल्या टप्प्यात ११३ किलोमीटर रस्त्यांची खोदाई झाली असून, १३३ किलोमीटर रस्त्यांवर पावसाळ्यानंतर खोदाई होणार आहे.

गॅस पाइपलाइनसाठी सुरू असलेल्या कामांसाठी कटरने रस्ते खोदकाम करण्याची गरज असताना आणि तशा सूचना असताना थेट पोकलॅन्डने रस्ता फोडून कामे होत असल्याने रस्त्याची दुरवस्था होते. त्यानंतर पावसाळा सुरू आहे म्हणून खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी होत नाही.

गेल्या वेळी रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याने किरकोळ अपघात होऊन तक्रारी वाढल्या होत्या तर यंदा मात्र, गॅस पाइपलाइन कामांसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे सामान्यांना त्रास भोगावा लागणार असेल तर मागच्या वर्षीच्या ठेच लागण्यापासून महापालिकेने यंदा काय बोध घेतला, हा मुद्दा चर्चेत येणार आहे.

NMC Nashik News
NMC School Uniform: मनपा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मार्गी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.