Nashik News: पूर्व भागातील रस्त्यांची चाळण; वळविलेल्या अतिरिक्त वाहतुकीने खड्डेच खड्डे

Road condition due to extra traffic leading to Chhatrapati Sambhajinagar
Road condition due to extra traffic leading to Chhatrapati Sambhajinagar
Updated on

Nashik News: कन्नड तालुक्यातील औट्रम घाट जड वाहतुकीसाठी ११ ऑगस्टपासून बंद केल्यापासून वैजापूर तालुक्यातील लोणी तलवाडा ते नांदगाव तालुक्यातील कासारीमार्गे वाहतुकीचा अतिरिक्त भार पडल्याने आधीच तलवाडा घाटात पडलेले मोठमोठे खड्डे या वाहतुकीने विस्तारले आहेत.

अनेक वाहने दररोज नादुरुस्त होऊन रस्त्यावर उभे राहत असलेल्याने अवघड वाहनधारक आता कन्नड तालुक्यातील पानपोही फाटा ते मनेगावमार्गे बोलठाण जातेगाव या रस्त्याने कासारी किंवा न्यायडोगरीमार्गे जात आहेत. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची चाळण होत आहे. (roads in eastern part of Nandgaon taluka are in bad condition nashik news)

या रस्त्याने दिवसभरात जाणाऱ्या अवजड वाहनाची संख्या सुमारे तीनशेपेक्षा अधिक झाली असून अगोदरच बोलठाण येथील उपबाजार समितीमध्ये दररोज कांदा, मका व धान्य घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या सातशेपेक्षा अधिक असून मानव विकास मिशनच्या आणि इतर चाळीसगाव, वैजापूर आणि नांदगाव आगाराच्या बस इत्यादी वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच हा रस्ता अनेक ठिकाणी नऊ फूट रुंदीचा असल्याने दोन अवजड वाहने समोरासमोर आल्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.

अगोदरच कमकुवत असलेला हा रस्ता आणि त्यावर अचानक वाढलेली वाहनांची वर्दळ त्यामुळे खारी, खामगाव, बोलठाण, जातेगाव, कासारी तसेच ढेकू ते न्यायडोगरी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडण्यास सुरवात झालेली आहे.

Road condition due to extra traffic leading to Chhatrapati Sambhajinagar
Nashik Leopard News: देवळाली मतदारसंघात बिबट्याचा वाढता वावर; पिंजरा लावण्याची मागणी

लवकरात लवकर या रस्त्याचे वाहतुकीच्या हिशोबाने सर्वेक्षण करून मजबूत आणि रुंद तयार करण्यात यावा तसेच या मार्गावरील सर्व गावांजवळ रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे.

शेकडोंच्या संख्येने वाहनांची बरोबरी आणि परिसरात ढेकू, जातेगाव, बोलठाण येथे प्राथमिक तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हे रस्त्याच्या बाजूलाच असल्याने सकाळ सायंकाळ मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यालयात जात असतात, त्यामुळे ठिकठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे असून रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे, अन्यथा हा रस्ताही वाहतुकीला बंद होऊ शकतो हे महामार्ग विभागाने लक्षात घ्यावे. खड्डे पडल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते आहे. या परिसरात राहणारे नागरिक आणि शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होत आहेत.

Road condition due to extra traffic leading to Chhatrapati Sambhajinagar
Nashik News: दरसरवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या विस्तारीकरणाचे एकावेळी 4 ठिकाणी कामे सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.