‘Phone Pe’वर पैसे जमा केल्याचे सांगत बंटी-बबलीची उचलेगिरी; तासाभरात अटक

Bunty bubbley's image captured in CCTV footage
Bunty bubbley's image captured in CCTV footageesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : दुकानदाराकडून वस्तू खरेदी केल्यावर ‘फोन पे’द्वारे पैसे जमा केल्याचा दिखावा करत वस्तू घेऊन दुचाकीवरून परागंदा झालेल्या ‘बंटी आणि बबली’च्या जोडगोळीला अवघ्या तासाभरात पकडण्यात वावी पोलिसांना यश आले. संबंधित दुकानदाराच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून या जोडगोळीची छायाचित्रे पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत त्यांना शरण येण्यास भाग पाडले. (robbers claiming to have deposited money on Phone Pe Arrested within an hour nashik Latest Marathi News)

तालुक्यातील वावी येथे बसस्थानकाजवळ काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संतोष जोशी यांचे अवधूत मशिनरी स्टोअर्स हे कृषिपूरक वस्तू विक्रीचे दुकान आहे. शनिवारी (ता. २७) दुपारी एकच्या सुमारास एक मध्यमवयीन व्यक्ती व महिला दुकानात आली. त्यांनी जोशी यांच्याकडे औषध मारण्याचा बॅटरी पंप घ्यायचा आहे, असे सांगून पंप घेतला.

त्याचे दोन हजार ७५० रुपये ‘फोन पे’ला सेंड करतो, असे सांगून दोन हजार ७५० रुपये जोशी यांच्या खात्यावर सेंड न करता इतर कोणाच्यातरी खात्यावर सेंड करून त्याचा स्क्रिन शॉट दाखवला. पैसे सेंड केले आहेत, असे सांगून ते दुकानातून निघून जात असताना जोशी यांनी पैसे सेंड झाले नाहीत, असे सांगितले. घाईघाईने ते त्यांच्या पल्सर मोटारसायकलवर बसून जोरात निघून गेले. जोशी यांनी सीसीटीव्ही फुटेज काढून वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांना दिले.

श्री. कोते यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांना या घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले. हे फुटेज स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद टिळे यांनी पाहिल्यार त्यांनी महिलेला ओळखले.

Bunty bubbley's image captured in CCTV footage
गटारींचे पाणी थेट गोदापात्रात; रामसेतूसह यशवंत महाराज पटांगणावरील चित्र

खातरजमा केल्यावर त्यांनी संबंधित महिलेचा पत्ता श्री. कोते यांना सांगितला. पोलिसांनी घरी जाऊन खात्री केली असता ती मिळून आली नाही. मात्र, सोशल मीडियावर आपली छायाचित्रे व्हायरल झाली असून, पोलिस येऊन गेल्याची माहिती मिळाल्यावर मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील असलेली ही महिला व तिचा साथीदार पुन्हा वावीला श्री. जोशी यांच्या दुकानात आले. त्यांनी अगोदर चुकीच्या खात्यावर पैसे सेंड झाल्याचे सांगत श्री. जोशी यांचे बॅटरी पंपाचे दोन हजार ७५० रुपये दिले.

मात्र पोलिसांनी लगेचेच या दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक श्री. कोते यांनी या दोघांची झाडझडती घेतल्यावर त्यांनी आपली नावे मयूर केशव कार्ले (२८, रा. कसारे, ता. संगमनेर, जि. नगर) व शारदा संतोष आराध्ये (२७, रा. सरदवाडी रोड, सिन्नर) अशी असल्याचे सांगितले. श्री. जोशी यांच्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

२० किलो शेंगदाणे लांबविले

सोशल मीडियावर या जोडीची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर व तासाभरात पोलिसांनी त्यांना पकडल्याचे समजल्यावर वावीतीलच किराणा दुकानदाराने पोलिस ठाणे गाठत श्री. कोते यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात याच महिलेने आपल्या दुकानातून वीस किलो शेंगदाणे खरेदी केले होते व पैसे ‘फोन पे’ केल्याचे सांगत निघून गेली. मात्र, या शेंगदाण्याचे पैसे अद्यापही जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला नसल्याचे या दुकानदाराने सांगितले.

Bunty bubbley's image captured in CCTV footage
Dhule : सेंधव्याजवळ 50 लाखांचे सागवान जप्त; विनापरवाना सुरू होती वखार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.