Nashik Crime : 2 ठिकाणी दरोडा; मारहाण, रोकडसह 3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल लांबविला

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

घोटी (जि. नाशिक) : शहरातील स्टेशन परिसरात भदे मळा येथे व दुर्गानगर येथे रविवारी (ता. १६) पहाटे दोन घरांवर सशस्त्र दरोडा टाकून दांडके व तलवारीने जखमी करत रोकडसह सोने असे एकूण तीन लाख ३८ हजारांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले. या हल्ल्यानंतर कुटुंबाने घोटी पोलिसांत माहिती देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर पथकासह घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (Robbery at 2 places in ghoti Beating 3 lakh 38 thousand items including cash were stolen nashik Latest Crime News)

शहरातील भदे मळा येथे पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान सहा-सात दरोडेखोरांनी जयवंत भदे यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत तलवार व दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. साखर झोपेत असलेल्या या कुटुंबीयाला काही समजण्याच्या आतच अंगावरील सोने ओरबाडून घेतले व कपाटातील रोख ८० हजार घेत नातवाच्या कानातील तसेच कपाटातील ३५ हजारांची सोन्याची पोत, १८ हजारांचे झुबे, आठ हजारांची कर्णफुले, ३० हजारांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेत वरील रूममधील मुलगा श्रीकांत याच्या रूमचा दरवाजा तोडत श्रीकांतला मारहाण करून संध्या यांच्या गळ्यातील ३८ हजारांचे मंगळसूत्र, ३० हजार खिशातून घेत जखमी केले. एकूण दोन लाख ३९ हजारांचा मुद्देमाल घेत पोबारा केला.

तसेच याच घरापासून तीनशे मीटरवर असलेल्या जावेद गणिभाई खान यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांना तलवार, चाकूचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण करत हातातली सोन्याच्या दोन अंगठ्या, पत्नी जस्मिन यांच्या कानातील सोन्याची पोत, नाकातील मुरमी, ३० हजारांच्या रोकडसह ३० हजारांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख ३२ हजारांचा मुद्देमाल नेताना जावेद यांचा मोबाईल फोडून जाताना दरवाजा बाहेरून लावत पोबारा केला.

Nashik Crime News
Nashik Crime News : Forex Tradingद्वारे तरुणाला तब्बल साडेआठ लाखांचा गंडा!

या घडलेल्या घटनेने दोनही कुटुंबातील सदस्य भयभीत झाले. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, विभागीय पोलीस अधीक्षक डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी भेट दिली. ठसेतज्ज्ञांना पाचारण करत दोन पथके दरोडेखोरांच्या मागावर पाठवत तपासाची चक्रे वेगाने फिरवले आहे.

या घटनेचा तपास उपनिरीक्षक संजय कवडे करत असून, हवालदार शीतल गायकवाड, विक्रम झाल्टे, मारुती बोराडे, प्रसाद दराडे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरोडेखोरांच्या मागावर उपनिरीक्षक नंदू कडभाने, धर्मराज पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे रविंद्र वानखेडे, मंगेश गोसावी, नवनाथ वाघमोडे यांनी धाव घेतली.

Nashik Crime News
Nashik : ग्रामस्थांना जुलाब, उलट्यांचा त्रास; 40 जणांना लागण झाल्याने भीतीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.