Nashik Crime: एअरगनचा धाक दाखवून व्यावसायिकाची लुट; संशयिताला अटक

Suspect arrested in forced theft at Nashik Road and seized items. Along with the team of City Crime Branch Unit One.
Suspect arrested in forced theft at Nashik Road and seized items. Along with the team of City Crime Branch Unit One.esakal
Updated on

Nashik Crime : गेल्या गुरुवारी (ता. २७) रात्री नाशिकरोडला एका व्यावसायिकाला कारमध्ये बसवून त्यास एअरगणचा धाक दाखवून त्याच्याकडील ऐवज, रोख रक्कम व एटीएमचा वापर करून ९७ हजारांची लुट करणार्या संशयिताच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने शहापूरमधून मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान, सदरचा गुन्हा चार दिवसांपूर्वीच दाखल होऊन या गुन्ह्याची नोंदीची मात्र नाशिकरोड पोलीस ठाण्याकडून दडवादडवी केल्याने याबाबत संशय व्यक्त होतो आहे.

एकीकडे शहरात गुन्हे घडत असताना त्यांची नोंद घेऊन वाढती गुन्हेगारी दडविण्यासाठी गुन्ह्यांची नोंदच दडविण्याचा नवी शक्कल शहर पोलिसांनी शोधून काढल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. (Robbery of businessman with airgun threat Suspect arrested Nashik Crime)

किरण परशुराम गोरे (२४, रा. बामणे, आवरे, ता. शहापूर, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एअरगन, बँकाचे डेबिट कार्ड, चोरीचा मोबाईल असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

शिवाजी बापूराव पवार (रा. नाशिकरोड) यांचा नाशिकरोडच्या गांधी रोडवरील चोरडिया सदनमध्ये ऑनलाईन पैसे पाठविण्याचा व्यवसाय आहे. गेल्या २७ तारखेला रात्री आठ वाजता त्यांनी दुकान बंद केले असता, त्यावेळी संशयित किरण याने दवाखान्यात अर्जंट पैसे पाठवायचे असल्याचे सांगत गळ घातली.

त्यासाठी कारमध्ये बसले असता संशयिताने त्याच्याकडील एअरगनचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत कार दारणा हॉटेलकडे नेली.

तेथे त्याने पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल, रोकड आणि एटीएम कार्ड घेऊन त्यावरून पैसे काढत असा सुमारे ९७ हजार रुपयांची लुट केली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखा युनिट एक करीत असताना, रविवारी (ता. ३०) सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांना संशयित किरण गोरे शहापूरचा असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने शहापूरातून संशयिताला जेरबंद केले. सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, संदीप भांड, महेश साळुंके, विशाल काठे, राजेश राठोड, किरण शिरसाठ यांनी बजावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Suspect arrested in forced theft at Nashik Road and seized items. Along with the team of City Crime Branch Unit One.
Nashik Crime: गंभीर गुन्ह्यांची 100 टक्के उकल! शहर पोलिसांची पहिल्या सहामाहीतील समाधानकारक कामगिरी

शहर पोलिसांची नवीच शक्कल

आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्ह्यांची वाढ झालेली आहे. त्यामुळे शहर पोलिसांवर टीका होत असताना आता पोलिसांनी गुन्ह्यांचीच दडवादडवी सुरू केल्याचा नवीनच प्रकार समोर आला आहे.

सदरचा जबरीचा चोरीचा गुन्हा गेल्या गुरुवारी घडूनही त्याची कोणतीही वाच्यता झाली नाही. अशारितीने अनेक गुन्ह्यांची दडवादडवी पोलीस ठाण्यांमध्ये केली जात आहे.

जेणेकरून शहरात गुन्हेच घडत नसल्याचे आव शहर पोलिसांकडून आणला जात असून, या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचीही साथ असल्याचे बोलले जाते.

शहर पोलिसांनी शोधून काढलेल्या या नवीन शक्कलेचा आश्चर्य व्यक्त होते आहे. परंतु यामुळे पोलिसांकडून शहराचीच दिशाभूल केली जात आहे याची जाणीव वरिष्ठ अधिकार्यांना नाही.

Suspect arrested in forced theft at Nashik Road and seized items. Along with the team of City Crime Branch Unit One.
Crime News: घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाच्या घरातून चोरले 11 लाख रुपये, 5 वर्षात बनली लखपती पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.