Crime Update : मुंबई महामार्गावर शेतकऱ्यांची ‘बंटी -बबली’ कडून लूटमार

crime news
crime news esakal
Updated on

नाशिक : मुंबई -ठाण्यात भाजीपाला विक्री करून रात्री मुंबई -आग्रा महामार्गाने परतणाऱ्या शेतकऱ्यांचा पिकअप वा टेम्पोचालकांना ‘कट मारल्याची’ कुरापत काढून दुचाकीवरून येणाऱ्या बंटी-बबलीकडून लूटमार केली जात आहे. या संदर्भात ठाणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रारी गेल्याने भिवंडी पोलिसांकडून रात्रीची पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे.

तसेच, या मार्गावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांचे भिवंडी पोलिसांकडून प्रबोधन केले जात आहे. दरम्यान, या संशयित बंटी-बबलीला गजाआड करण्यासाठी भिवंडी पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (robbery of farmers by Bunty Babli theives on Mumbai highway Nashik Latest Crime News)

नाशिक, नगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मुंबई - ठाण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जातात. सायंकाळी भाजीपाला विक्री झाल्यानंतर ते रात्री परतीच्या मार्गाला लागतात. या दरम्यान, मुंबई- आग्रा महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते मानकोली नाका या दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास शेतकऱ्याच्या पिकअप वा टेम्पोचा पाठलाग करीत दुचाकीवरून संशयित बंटी- बबली येऊन शेतकऱ्यांची वाहने रोखतात.

त्यावेळी संशयित त्यांना ‘आम्हाला कट का मारला’ अशी कुरापत काढून वाहनचालक व शेतकऱ्याला चाकूचा धाक लावतात आणि त्यांच्याकडील पैसे हिसकावून पोबारा करतात. विशेषतः: एमएच १५ पासिंग असलेल्या वाहनांना या बंटी-बबलीकडून लक्ष केले जात आहे. या संदर्भात भिवंडी पोलीसात गुन्हे दाखल असून, असे प्रकार वाढल्याने भिवंडी पोलिसांकडून या महामार्गावर रात्रीची पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. तसेच या संदर्भात भिवंडी पोलिसांकडून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत सावधगिरी बाळगण्याबाबत आवाहन केले जात आहे.

crime news
'ती'ने डाॅक्टर पतीलाच टाेचले भुलीचे इंजेक्शन; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

सोशल मीडियावर व्हायरल

संशयित बंटी-बबलीची जोडी रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत लूटमार करीत असल्याचे समोर येत आहे. या संदर्भात भिंवडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शेलार यांनी महामार्गावरून जाणाऱ्या भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये जनजागृती करीत आहेत.

या बाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून त्यात पोलिसांनी, संशयित बंटी- बबलीकडून अडवणूक होत असल्यास वाहन थांबवू नये. वाहनाची काच बंदच ठेवावी, ११२ या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच माल विक्रीचे पैसे खिशात वा सिटखाली न ठेवता दुसऱ्या ठिकाणी ठेवावेत, असे आवाहन उपनिरीक्षक शेलार यांनी केले आहे.

crime news
PFIच्या मालेगातील आणखी 2 कार्यकर्त्यांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()