कष्टाचे झाले चीज! शेतकरी आई-वडिलांची मेहनत फळाला; लेकीच्या यशाचं पंचक्रोशीत कौतुक

rohini.jpg
rohini.jpg
Updated on

येवला (नाशिक) : परिस्थिती कशीही असली अन् मनात काही करण्याची जिद्द असेल तर यशाला गवसणी घालता येतेच हे दाखवून दिले आहे विसापूर येथील रोहिणी ढोमसे या विद्यार्थिनीने. तिने आईवडिलांना शेतीकामात मदत करत प्रतिकूलतेवर मात करत धानोरा येथील मातोश्री फार्मसी महाविद्यालयात मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे.

लहानपणापासूनच शिक्षणाची जिद्द... 

मातोश्री फार्मसी महाविद्यालयातून रोहिणी ढोमसे ९५.६० टक्के मिळवत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मात्र तृतीय क्रमांक मिळूनही रोहिणीने प्रतिकूलतेत मिळवलेले यश कौतुकाचे मानले जात आहे. ग्रामीण भागात राहत असल्याने क्लासची सोय नाही. तशी आर्थिक परिस्थितीही नाही. त्यात कोरोनामुळे महाविद्यालय बंद असल्यामुळे होईल तेवढा घरीच अभ्यास करून तालुक्यातील विसापूर येथील रोहिणी विलास ढोमसे या विद्यार्थ्यांनीने डी. फार्मसीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थीही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लहानपणापासूनच शिक्षणाची जिद्द असलेल्या रोहिणीचे प्राथमिक शिक्षण विसापूर येथे तर माध्यमिक शिक्षण कातरणी येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात झाले. तिने धानोरा येथील मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या प्रथितयश संस्थेत प्रवेश मिळाला. 

दररोज ५० किमीचा प्रवास 

घर ते कॉलेज हे येऊन जाऊन ५० किमीचा प्रवास दररोज करावा लागायचा. त्यात शेतकरी कुटुंब असल्याने वेळोवेळी आईवडिलांना शेतीकामात मदत करावी लागायची. त्यामुळे अभ्यासाला कमी वेळ मिळायचा. अत्यंत गरीब परिस्थितीतुन कुठेही क्लास न लावता स्वत:च्या मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करत तिने हे यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थीनीचे परिरात कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.