नाशिक : येथील क्रीडापटू रोहित सुभाष पवार याने शनिवारी (ता. ५) अमेरिकेतील पनामा शहरात पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत निर्धारित वेळेपेक्षा तब्बल पाच तास आधीच पूर्ण करुन निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सहा महिन्यांपूर्वीचे स्वतःचे रेकॉर्ड मोडून दुसऱ्यांदा आयर्नमॅन होण्याचा मान रोहितने मिळविला आहे. रोहितचे वडील डॉ. सुभाष पवार हे भारतातील सर्वात वयोवृद्ध आणि जलद आयर्नमॅन ठरलेले आहेत. (Rohit pawar of Satpur wins Ironman in Florida for second time Nashik Latest Marathi News)
अतिशय खडतर असलेल्या या स्पर्धेत रोहित पवार यांनी 4 किलोमीटर स्विमिंग 1 तास 29 मिनिटात, 180 किलोमीटर सायकलिंग 5 तास 29 मिनिटात तर 42 किलोमीटर रनिंग 4 तास 48 मिनिटात पूर्ण करुन ही 17 तासाची स्पर्धा नियोजित वेळेच्या पाच तास आधीच म्हणजेच 12 तास पाच मिनिटात ही स्पर्धा यशस्वी पार करत नाशिकचा डंका अमेरिकेत वाजविला आहे. सहा महिन्यांपूर्वीच जून महिन्यात अमेरिकेतील मोईन्स येथे आयोजित आयर्नमॅन स्पर्धेत निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास अगोदर पूर्ण करुन आयर्नमॅनचा किताब रोहितने पटकावला होता.
रोहितचे शालेय शिक्षण नाशिक येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुणे येथील सिंहगड कॉलेजमध्ये त्यांनी बी.ई. पूर्ण केले असून अमेरिकेतील फ्लोरिडा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून तो कार्यरत आहेत. गत 4 वर्षांपासून त्याने व्यायामावर लक्ष केंद्रित करुन ही स्पर्धा पूर्ण करण्याची किमया करुन दाखवली. नाशिकच्या आभिमानात आणखीन एक नवीन मानाचा तुरा रोवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.