पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोरोनाच्या काळात (coronavirus) कष्टकऱ्यांची मोठी उपासमार झाली, पण रोहयो ही शासनाची योजना मंजुरांना हक्काचे पैसे मिळवून देण्यात सक्षम ठरली आहे. तालुक्यात शेकडो मंजुरासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आधार ठरू लागली आहे. केंद्र सरकारची ही योजना असून, आर्थिक वर्षात एका कुटुंबाला शंभर (family) दिवसांचा रोजगार (Employment) या मधून देण्यात येतो. पूर्वी रोजगार हमी योजनेच्या कामावर असणाऱ्या मजुराला दिवसाला २०६ रुपये दिले जायचे, पण गेल्या वर्षी एप्रिलपासून मजुरीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता दिवसाला २४८ रुपये मिळत आहेत. त्यातच आठ दिवसांत पैसे बँक खात्यावर जमा होतात. परिमाणी, ही योजना कष्टकऱ्याच्या फायद्याची ठरू लागली आहे.
ग्रामपंचायतीत जॉबकार्डधारक मजुरांच्या नोंदी
कोरोना संकट असतानाही निफाड तालुक्यात रोहगार हमी योजनेच्या कामांमुळे मजुरांना मोठा आधार मिळत आहे. तालुक्यात २१८ कामे सुरू आहेत. या अंतर्गत फळबाग व वृक्षलागवड, गोठे, शौचालये अशी कामे साकारत आहेत. सव्वा दोनशे मजुरांच्या हाताला कोरोनाच्या संकटकाळात काम मिळाले आहे. एप्रिलपासून २१८ कामे प्रगतिपथावर आहेत. त्यासाठी ६६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. खेडे, जळगाव, कसबे सुकेणे, सुभाषनगर, नांदुर्डी, रूई, रेडगाव आदी गावांमध्ये ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. संबंधित ग्रामपंचायतीत जॉबकार्डधारक मजुरांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
रोहयोमुळे मजुरांच्या हाताला काम
निफाड तालुक्यात ऑनलाईन जॉबकार्डधारक मजुरांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. कोरोना संकटात रोहयोमुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. कामाचे पैसे बँक खात्यांवर जमा होतात. मागणी केल्यानंतर काम उपलब्ध करून दिले जात आहे. -संदीप कराड, गटविकासाअधिकारी, निफाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.