RSS Shastra Pujan Utsav : पथसंचलनात 2 हजार स्‍वयंसेवकांचा सहभाग

RSS Path Sanchalan
RSS Path Sanchalanesakal
Updated on

नाशिक : विजयादशमीचे औचित्‍य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरातील विविध २१ नगरामध्ये शस्त्रपूजन उत्सव पार पडला. तसेच बुधवारी (ता. ५) विविध भागात संचलन करताना स्‍वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. चिमुकल्‍यांपासून ज्‍येष्ठांपर्यंत एकूण दोन हजार ८७ स्‍वयंसेवकांनी संचलनात सहभाग नोंदविला. विविध भागात स्‍वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करत जल्‍लोषात स्‍वागत करण्यात आले. (RSS Shastra Puja Utsav dasara 2022 2000 volunteers participated in street parade Nashik Latest Marathi News)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेनुसार बुधवारी शहरातील मखमलाबाद, अमृतधाम, पंचवटी, भद्रकाली, रविवार कारंजा, सातपूर, महात्मानगर, गंगापूर रोड, इंदिरानगर, सिडको, जेलरोड, नाशिक रोड, भगूर आणि शहरातील इतर काही भाग असे संघ रचनेतल्या एकूण २१ नगराचे पूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचे घोषपथकासह पथसंचलन पार पडले. शहरातील रस्त्यावर पथसंचलनाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या मांडलेल्‍या होत्‍या.

तसेच काही ठिकाणी पुष्पवृष्टी करत नागरीकांनी जल्‍लोषात स्‍वागत केले. पथसंचलनांमध्ये मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, राजेश खपली, डॉ. अशोक थोरात, नृसिंह कृपा प्रभू यांच्‍यासह विविध भागात मान्‍यवरांनी सहभाग नोंदविला. अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर, लक्ष्मण सावजी, विभाग कार्यवाह प्रमोद कुलकर्णी, शहर संघचालक विजय कदम, सह संघचालक डॉ. विजय मालपाठक, शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांच्‍यासह कार्यवाह डॉ. अविनाश भावसार, सहकार्यवाह मंगेश खाडिलकर उपस्थित होते.

RSS Path Sanchalan
Ravan Dahan 2022 : गांधीनगरला आज 58 फुटी रावणदहन; यंदा 67वे वर्ष

प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघातर्फे केलेल्‍या शस्त्रपूजन उत्सवात स्वयंसेवकांसोबत परिसरातील नागरिकदेखील सहभागी झाले होते. उत्सवादरम्यान स्वयंसेवकांनी प्रत्युत प्रचलनम, सामूहिक समता, दंड, सूर्यनमस्कार, निर्युद्ध अशा विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर करताना लक्ष वेधले. यानंतर विविध वक्त्यांनी स्वयंसेवक तसेच उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. विविध नगरातील झालेल्‍या संचलनामध्ये पूर्ण गणवेशातील एक हजार ६१० स्‍वयंसेवक सहभागी झाले होते. तर अन्‍य ४७७ नागरिक अशा एकूण दोन हजार ०८७ जण या संचलनात सहभागी झाले होते.

RSS Path Sanchalan
Horse Market : 61 लाखांच्या घोडीने वेधले लक्ष; लाखोंची उलाढाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.