वैद्यकीय परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना RT-PCR चाचणी सक्‍तीची

medical examination
medical examinationGoogle
Updated on
Summary

न्‍यायालयाच्‍या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासोबत आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्‍ह असल्‍याचा अहवाल सादर करायचा आहे. दरम्‍यान, या परीक्षेत सर्व वैद्यकीय शाखांतील पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थी, तसेच अन्‍य काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतील विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

नाशिक : ऑफलाइन लेखी परीक्षेला सामोरे जाणार नसल्‍याचा दावा राज्‍यातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. मात्र, ठरलेल्‍या वेळापत्रकानुसारच गुरुवार (ता. १०)पासून परीक्षा घेतली जाणार असल्‍याचे महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाने (Maharashtra University of Health Sciences) स्‍पष्ट केले आहे. राज्‍यातील १६७ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेत ४० हजार ६६१ विद्यार्थी प्रविष्ट होतील. सर्व विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणीचा (Rt-PCR Test) निगेटिव्‍ह अहवाल परीक्षा केंद्रात प्रवेश करताना सादर करायचा आहे, असेही स्‍पष्ट केले आहे. (rt-pcr test is mandatory for students to attend medical course examination)


यापूर्वीच मुंबई उच्च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठात परीक्षा स्‍थगित करण्यासंदर्भात दाखल याचिका फेटाळली होती. मात्र, लेखी परीक्षेला सामोरे जाणार नसल्‍याची भूमिका राज्‍यातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांकडून उमटल्‍या होत्‍या. यासंदर्भात विद्यापीठाने भूमिका स्‍पष्ट करत परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्‍याचे सांगितले. न्‍यायालयाच्‍या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासोबत आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्‍ह असल्‍याचा अहवाल सादर करायचा आहे. दरम्‍यान, या परीक्षेत सर्व वैद्यकीय शाखांतील पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थी, तसेच अन्‍य काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतील विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

medical examination
सावत्र आईने मुकबधीर लेकराला दिले गुप्तांगावर चटके


परीक्षा केंद्रांना अतिरिक्‍त निधी

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा केंद्र निर्जंतुकीकरणासह अन्‍य विविध सूचना विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना दिल्‍या आहेत. तसेच नियमित खर्चाव्‍यतिरिक्‍त प्रत्‍येक परीक्षा केंद्रास २० हजार रुपये अतिरिक्‍त निधी दिला आहे.


आता परीक्षेच्‍या वेळापत्रकात कुठल्‍याही स्‍वरूपातील बदल करण्यापूर्वी उच्च न्‍यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. विद्यापीठाने परीक्षेचे चोख नियोजन केले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना विमाकवच योजनाही लागू आहे. संभ्रमात न पडता विद्यार्थ्यांनी ठरलेल्‍या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी.
-डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ


यापूर्वी अंतिम वर्षाच्‍या परीक्षादरम्‍यान प्रकृती खालावल्‍याने एका विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला होता. त्‍यामुळे आमचा ऑफलाइन परीक्षेला विरोध आहे. ऑनलाइन परीक्षा घ्यावी, अशी आमची मागणी आहे. लोकप्रतिनिधींना भेटूनही प्रतिसाद न मिळाल्‍याने आगामी निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
- रूपेश नाठे, विद्यार्थी प्रतिनिधी

(rt-pcr test is mandatory for students to attend medical course examination)

medical examination
कोल्हापूरात मराठा मोर्चाचा एल्गार; हजारो नाशिककर होणार सहभागी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()