VIDEO : द्राक्ष नगरीत ‘रु-द्राक्ष’ची कृपा! आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे

या वर्षी उन्हाळ्यातही मोहर आल्याने आश्चर्य व्यक्त
rudraskh
rudraskhesakal
Updated on

नाशिक : द्राक्षांसाठी (grapes) प्रसिद्ध नाशिकमध्ये (nashik) स्पेस ॲम्बॅसेडर अविनाश शिरोडे यांनी रुद्राक्षची लागवड केलेली आहे. साठ ते सत्तर फूट उंचीच्या झाडांना सध्या फुलांचा आणि फळांचा बहर आला आहे. या वृक्षास हिवाळ्यातच मोहर येतो. पण या वर्षी उन्हाळ्यातही मोहर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Rudraksha benefit in nashik marathi news)

आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे

कैलास मानसरोवराच्या सहलीस शिरोडे दांपत्य गेले असता नेपाळच्या मित्राच्या आईने आशीर्वाद म्हणून दिलेली रुद्राक्षाची रोपे बंगल्याभोवती लावली होती. ती सध्या फुलांनी व फळांनी बहरली आहेत. आयुर्वेदात आणि अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. उच्च रक्तदाब नियंत्रण व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्षाची माळ परिधान करतात. मधुमेह असलेल्या व्यक्तीने रुद्राक्ष उगाळून ते चाटण मधासोबत सेवन केले तर आरोग्यास चांगला फायदा होतो. जप करण्यासाठी १०८ रुद्राक्षे असलेली माळ वापरतात. सोने आणि चांदीचा वापर करून मौल्यवान मळा तयार केल्या जातात. भारत, नेपाळ, इंडोनेशिया (बाली) आणि हिमालयात ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आढळते.

रुद्राक्षमाला परिधान करण्याची परंपरा

रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी असे विविध प्रकार आढळतात. दुर्मिळ रुद्राक्ष मौल्यवान व किमती असतो. त्याचे मूल्य रुद्राक्ष किती मुखांचा आहे, आकार कसा व केवढा आहे यावर ठरते. लहान रुद्राक्ष मुगाच्या दाण्याएवढा, तर मोठा अक्रोडएवढा असतो. कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष परिधान केल्याने उपयुक्त ठरलेले आहे. रुद्राक्षाचे फळ हे शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे, असे मानले जाते. भारतात रुद्राक्षमाला परिधान करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. विशेषकरून शिवभक्तांच्या गळ्यात या माळा दिसतात.

rudraskh
अंत्यसंस्काराचे वेटिंग टळणार; महापालिका करणार स्वतंत्र ॲप विकसित

सात ते आठ हजार रुद्राक्षे

आशीर्वाद म्हणून नेपाळमधील मित्राच्या आईने ११ रोपे दिली होती. त्यातील पाच घराभोवती लावली. उरलेली सहा नातेवाइकांना दिली. त्यातील फक्त आमच्याकडीलच जगली आहेत. तयार झालेले रुद्राक्ष महादेव मंदिर, शिवभक्त यांना वाटली जातात. एका सीझनला सुमारे सात ते आठ हजार रुद्राक्षे मिळतात. -अविनाश शिरोडे, स्पेस ॲम्बॅसेडर

फळे परिपक्व झाल्यानंतर झाडावरून खाली पडतात. ती सालीसह पाण्यात भिजत छेव्यानंतर काही दिवसात साल झडते. आतील बी म्हणजेच रुद्राक्ष मिळते. ब्रशच्या साह्यायाने खाच खळ्यातील गर काढल्यानंतर रुद्राक्ष तयार होतो. - शर्मिष्ठा शिरोडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.