आधी बिबट्या.. आता चक्क सिंह? ग्रामस्थ दहशतीखाली

lion
lionesakal
Updated on

पिंपळगाव (जि. नाशिक) : देवळा तालुक्यातील सर्वाधिक शेतशिवार असलेल्या दहिवड येथील भौरी शिवारात काही दिवसांपासून सिंहसदृश्य (lion) वन्य प्राण्याने धुमाकूळ घातला असल्याची चर्चा आहे. आजपर्यंत या प्राण्याने परिसरातील शेतकऱ्यांची जवळपास (wild animal) ४० ते ५० जनावरे फस्त केल्याची माहिती स्थानिक देत आहेत. यामुळे नागरिक भितीचे वातावरण आहे. यावर वन विभागाने (forest department) एक आवाहन केले आहे

दहिवड शिवारात सिंह?

देवळा तालुक्यातील सर्वाधिक शेतशिवार असलेल्या दहिवड येथील भौरी शिवारात काही दिवसांपासून सिंहसदृश्य वन्य प्राण्याने धुमाकूळ घातला असल्याची चर्चा असून शेतकऱ्यांची जवळपास ४० ते ५० जनावरे फस्त केल्याची माहिती स्थानिक देत आहेत. देवळा वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्वरित या परिसराला भेट देत चाचपणी केली. मात्र, नागरिकांना दिसलेला सिंहसदृश प्राणी नेमका कोणता, याबाबत कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत. या परिसरात वन्य प्राण्यांची दोन ठिकाणी आढळून आलेल्या विष्ठेचे नमुने नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, दोन दिवसांपासून गस्त घालत आहेत. दहिवड शिवारात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे परीक्षण केले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या माणिक साळुंखे यांनी ‘सकाळ’ला दिली. दरम्यान दहिवड शिवारातील भौरी परिसरात सिंहसदृश हिंस्र प्राणी आढळून आल्याची केवळ अफवा असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

lion
Independence Day 2021 : चक्क रोबोने केले ध्वजारोहण!

देवळा वन विभागाकडून स्पष्टीकरण

दहिवड परिसरात सिंहसदृश्य हिंस्र प्राण्याच्या अस्तित्वाबाबत सध्या चर्चा आहे. व्हॉट्सॲपद्वारे व्हायरल झालेला सिंहाचा व्हिडिओ दहिवड परिसरातील नाही. नेटीझन्सने कुठल्याही ठिकाणचे सिंहाचे व्हिडिओ डाउनलोड करून त्याला दहिवड परिसरातील व्हिडिओ म्हणून प्रसारित करून नागरिकांची दिशाभूल करू नये. -संजय दहिवडकर, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना

दहिवड परिसरात सिंहसदृश्य हिंस्र वन्य प्राण्याचा वावर आढळून आल्याची बाब खोटी आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये. परिसरात बिबट, लांडगे, तरस या वन्य प्राण्यांचा वावर आहे. परंतु याबाबत नागरिकांनी जागरुक राहावे. -व्ही. बी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, देवळा

lion
नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करणार : भुजबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()