Nashik News : पेठ रोडसाठी नगरविकास विभागाकडे धाव; पालकमंत्री भुसे, आमदार ढिकले संयुक्त मागणी करणार

While inspecting the situation, Guardian Minister Dada Bhuse, MLA Adv. Rahul Dhikle, City Engineer Shivkumar Vanjari.
While inspecting the situation, Guardian Minister Dada Bhuse, MLA Adv. Rahul Dhikle, City Engineer Shivkumar Vanjari.esakal
Updated on

नाशिक : पेठ रोडवरील तवली फाटा ते महापालिका हद्दीपर्यंत जवळपास चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था विधीमंडळात पोचल्यानंतर त्यावर उतारा म्हणून पालकमंत्री दादा भुसे व आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी गुरुवारी (ता. ३०) संयुक्त पाहणी केल्यानंतर आता थेट शासन दरबारी जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काँक्रिटचा रस्ता तयार करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे निधीची मागणी करण्याचा निर्णय घेतला. (Run to Urban Development Department for Peth Road Guardian Minister Bhuse MLA Dhikle will make joint demand Nashik News)

पेठकडून नाशिक शहरात प्रवेश करताना राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील हॉटेल राऊ ते तवली फाटा दरम्यान जवळपास चार किलोमीटरच्या रस्त्याची चाळण झाली आहे. जवळपास चार किलोमीटरचा रस्ता पार करताना २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच त्याशिवाय येथून कायम प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना विविध शारीरिक आजारांना सामोरे जावे लागते. धुळीमुळे या परिसरातील घरे कुलूप बंद आहेत. दम्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी निधीची कमतरता भासल्याने स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून रस्ता तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्यासाठी 71 कोटी रुपयांचा खर्च स्मार्ट सिटी कंपनीने करावा, अशा सूचना देण्यात आल्या. परंतु, स्मार्टसिटी कंपनीने निधी देण्यास नकार दिला.

त्यानंतर आमदार ढिकले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची मागणी केली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडेदेखील पाठपुरावा केला, परंतु निधी मिळाला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात ढिकले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याअनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह ढिकले यांनी जागेची पाहणी केली.

While inspecting the situation, Guardian Minister Dada Bhuse, MLA Adv. Rahul Dhikle, City Engineer Shivkumar Vanjari.
Yeola Market Committee Election : येवल्यात शिवसेना लढणार निवडणूक! पालवे, शेळके यांची माहिती

गुजरातकडून येताना सदर रस्ता काँक्रीटचा असल्याने त्याच धर्तीवर काँक्रीटचा रस्ता करावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार असल्याने पालकमंत्री भुसे व ढिकले दोघेही संयुक्तरीत्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी नगरसेवक श्याम साबळे, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे या वेळी उपस्थित होते. महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी तात्पुरत्या दुरुस्तीसाठी जवळपास पावणेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याची माहिती दिली. परंतु निधीची कमतरता भासणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

"महापालिका हद्दीबाहेर काँक्रीटचा रस्ता आहे. त्यामुळे हॉटेल राऊत ते नाशिक महापालिका हद्दीपर्यंत रस्तादेखील काँक्रीटचा करावा यासाठी शासनाकडून निधी मागितला जाणार आहे."

- ॲड. राहुल ढिकले. आमदार.

While inspecting the situation, Guardian Minister Dada Bhuse, MLA Adv. Rahul Dhikle, City Engineer Shivkumar Vanjari.
Nashik News : नाशिक रोडला आरटीओचे कार्यालय होण्याचा मार्ग मोकळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.