येवला (जि. नाशिक) : येथे एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत पाणी टाकून आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. नाशिक येथून औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या एसटी महामंडळाच्या सिल्लोड डेपोची बस येवल्यात जनता महाविद्यालयासमोर आल्यानंतर बसच्या रेडिएटरमधून अचानक दूर निघायला लागला. ( running bus caught fire in Yeola no casualities Nashik News)
धुराचे प्रमाण वाढल्याने चालकाला काहीतरी बिघाड झाल्याचे तत्काळ लक्षात आले. या वेळी तत्काळ एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी करत सर्व ५४ प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर बसचालक रघुनाथ बावसकर यांनी प्रसंगावधान राखत शेजारील घरातून पाणी आणून पाणी टाकल्याने आग विझली. त्यानंतर चालक व वाहक यांनी येवला डेपोशी संपर्क साधून बसमधील प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था केली.
चालकाच्या समय सुचकतेमुळे सर्वांचे प्राण वाचल्याने सर्वांनी बावसकर यांचे आभार मानले. एसटी महामंडळाच्या बसच्या बाबतीत असे प्रकार सतत घडत असल्याने महामंडळाने याबाबत ठोस उपाययोजना करून जुनाट व त्रासदायक बस लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठवू नये तसेच दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी ही प्रवासी संघटनांकडून केली जाऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.