नाशिक : आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आजपासून (ता.४) पोलिस शिपाई पदासाठीच्या मैदानी चाचणीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी बोचऱ्या गार वाऱ्यांचा सामना करीत भरतीसाठी आलेल्या तरुणांचा मैदानावर चांगलाच कस लागला. मैदानी चाचणीत उत्कृष्ट गुण मिळविण्यासाठीच सारे प्रयत्न करताना दिसले.
परंतु तरीही काहींना अपेक्षित गुण मिळत नसल्याने त्यांचा हिरमोडही होत होता. मात्र तरीही पुढच्या चाचणीसाठी ते तेवढ्याच उत्साहाने सामोरे जात होते. असे असले तरी मैदानातून बाहेर पडताना मात्र या तरुणांना शरीरात त्राणच उतर नव्हता. (Rural Police Recruitment struggle of youth while giving field test nashik news)
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ पोलिस शिपाई पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला. भरतीच्या पहिल्या दोन दिवसात गेल्या सोमवारी व मंगळवारी पोलिस वाहन चालकासाठीची मैदानी चाचणी घेण्यात आली. तर, आजपासून पोलिस शिपाईपदासाठीच्या मैदानी चाचणीला सुरवात झाली. आजच्या पहिल्याच दिवशी १३०० तरुणांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते.
परंतु, प्रत्यक्षात ८११ तरुणांनी दिवसभरात मैदानी चाचणी दिली असून, त्यापैकी ६७७ तरुण या चाचणीतून पात्र ठरले आहेत. तर, १३४ तरुण काही ना काही कारणांनी अपात्र ठरलेले आहेत. गेल्या दोन दिवसात झालेल्या वाहन चालक पदासाठीही ९८४ उमेदवारांनी दांडी मारली. त्याप्रमाणेच पोलिस शिपाई पदाच्या पहिल्याच दिवशी मैदानी चाचणीला ४८९ तरुणांनी दांडी मारली आहे.
पोलिस शिपाईपदासाठी तरुणांना वजन, उंचीत पात्र ठरल्यानंतर त्यांची छाती फुगविता व न फुगविताची मोजणी झाल्यानंतर त्यास गोळाफेकची चाचणी द्यावी लागत होती. याठिकाणी मात्र तरुणांचा चांगलाच कस लागत होता. साडेसहा मीटरच्या पुढे क्वचितच कोणाचा गोळा जात होता.
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
यानंतर, १०० मी. धावण्याची चाचणीतही तरुण जीव ओतून धावत होते. तरीही काही तरुणांना हे अंतर धावण्यासाठी महाप्रयास करावा लागला. यानंतर शेवटी १६०० मी. अंतर धावण्याची चाचणी होती. यात ज्यांनी सराव केलेला असेल त्यांना हे अंतर वेळेत पूर्ण करण्यासाठी सहजसोपे होते.
चाचणीमध्ये पारदर्शकता
मैदानी चाचणीचे प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते. त्याचप्रमाणे, प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी उमेदवारास त्याच्या क्षमतेनुसार मिळणाऱ्या गुणांचे अवलोकनही करून दिले जात होते.
त्यामुळे मैदानी चाचणीसाठी पारदर्शक प्रक्रिया राबविले जाते आहे. त्यानंतरही शंका आल्यास प्रथम अपिलातही समाधान न झाल्यास दुसरे अपील थेट पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे करण्याचीही सुविधा होती. त्यासाठी अधीक्षक उमाप हे मैदानावरच ठाण मांडून होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.