Nashik Encroachment: गोदाकाठी अतिक्रमणांची गर्दी; महापालिकेचे दुर्लक्ष, पूररेषा तपासण्याच्या सूचना

Encroachment of slums on Godavari floodplain.
Encroachment of slums on Godavari floodplain.esakal
Updated on

Nashik Encroachment : पावसापूर्वी महापालिकेकडून आपत्कालीन आराखडा तयार करण्याबरोबरच नदी काठी पूररेषेतील अतिक्रमणे हटविली जातात.

परंतु ७ जून ही पावसाची अधिकृत तारीख उलटून बारा दिवस झाले तरी अद्यापही गोदावरी नदी किनारी असलेले निवासी प्रकाराचे अतिक्रमणे हटत नाही. (Rush of encroachments along goda ghat Negligence of NMC instructions to check flood line nashik news)

गोदाकाठी पाली टाकून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनादेखील त्याची कुठलीच भीती वाटतं नाही. किमान महापालिकेने तातडीने कारवाई करून पालिसह दुकाने हटविणे गरजेचे आहे.

नाशिक महापालिका हद्दीतून गोदावरी नदीचा प्रवास १९ किलोमीटरचा आहे. या प्रवासात शहराच्या मुख्य भागातून जवळपास दहा किलोमीटर नदी प्रवाहित होते. याच भागात मोठी बाजारपेठ असल्याने येथे गर्दीदेखील होते.

दर बुधवारी गोदाघाटावर मोठा भाजी बाजार भरतो. रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीता कुंडासह धार्मिक विधीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. परंतु नदीच्या दोन्ही किनारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत.

गोदाघाट परिसरात नागरिक पाल टाकून वास्तव्य करतात भाजी बाजाराच्या पटांगणाच्या बाजूला फुटपाथवर पाल टाकून वास्तव्य करणारे नागरिक वाढतं आहे. त्याच बरोबर पान व चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थ विक्रीचे दुकाने मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Encroachment of slums on Godavari floodplain.
NMC Water Tap Connection: अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाला मुदतवाढ

परंतु महापालिकेकडून या भागातील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ७ जूननंतर महापालिकेकडून आपत्कालीन विकास आराखड्याची अंमलबजावणी केली जाते.

महापालिकेच्या आपत्कालीन आराखड्यात डोळ्यांना दिसणाऱ्या पूररेषेतील अतिक्रमणाचा संबंध नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी गोदाकाठावरील झोपड्या हटविण्यात आल्या होत्या. परंतु पुन्हा परिस्थिती जैसे-थे झाली. कायमस्वरूपी कार्यवाही होणे गरजेचे आहे.

"मॉन्सूनपूर्व कामांच्या आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना नालेसफाई पूर्ण करा, पूररेषा तपासून नदीपात्राजवळचे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागांवरही अतिक्रमण होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे." - भाग्यश्री बानाईत, आयुक्त, महापालिका.

Encroachment of slums on Godavari floodplain.
NMC News: ठेका मुदतवाढीच्या फंड्याला ब्रेक! प्रस्ताव सादर न करण्याच्या प्रभारी आयुक्तांच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.