Nashik News : मुद्रांक विक्रेत्यांकडे स्टॅम्प पेपरचा पुरेसा साठा; 2 दिवस तुटवडा

Farmers flock to stamp sellers for stamp paper.
Farmers flock to stamp sellers for stamp paper. esakal
Updated on

Nashik News : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान पोटी ३५० रुपये क्विंटल जाहीर केले असून त्यासाठी त्यासाठी अनेक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. (rush to buy stamp paper worth Rs 100 from stamp dealers nashik news)

त्यात स्टॅम्प पेपर लागत असल्याने शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात नांदगाव शहरात सोमवारपासून (ता. १०) स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना स्टॅम्प मिळण्यास तारेवरची कसरत करावी लागत होती. दरम्यान, बुधवारपासून (ता. १२) स्टॅम्प विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कांदे जर मुलाच्या नावाने विक्री केले असेल व ७/१२ वडिलांच्या नावावर असेल तर त्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करून देणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी होत आहे. नांदगाव शहरात काही मोजकेच मुद्रांक विक्रेते आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Farmers flock to stamp sellers for stamp paper.
Nashik News : नव्याने उपअभियंता भरतीने जुन्यांच्या पदोन्नतीला ब्रेक! राज्यपत्रित अभियंत्यांना भीती

त्यांच्याकडे स्टॅम्प खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. नांदगाव शहरात सोमवारपासून (ता.१०) दोन दिवस बीएसएनएलची केबल कट झाल्याने इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने स्टॅम्प विक्रेत्यांना ऑनलाइन चलन भरता न आल्याने स्टॅम्प घेता आले नाही.

त्यामुळे स्टॅम्प पेपरचा तुटवडा झाला. या तुटवड्याचा गैरफायदा घेऊन काही मुद्रांक विक्रेते चढ्या भावाने मुद्रांक विक्री करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. नांदगाव जुन्या तहसील आणि नवीन तहसील कार्यालयाबाहेर ही स्थिती दिसून आली आहे.

"बीएसएनएलची केबल कट झाल्याने सोमवारपासून दोन दिवस इंटरनेट सुविधा बंद असल्याने ट्रेझरीचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले होते. ट्रेझरीत चलन भरता येत नसल्याने विक्रेत्यांना स्टॅम्प पेपर मिळालेले नाही. बुधवारी बीएसएनएल कार्यालयात पत्र व्यवहार करून इंटरनेट सुरू झाले आहे. मुद्रांक कोटा उपलब्ध करून नांदगाव व मनमाडला विक्रेत्यांकडे पुरेपूर उपलब्ध करून दिला आहे आता स्टॅम्प चा तुटवडा नाही."- मधुकर हाजारे, उपकोशागार अधिकारी, नांदगाव

Farmers flock to stamp sellers for stamp paper.
Dada Bhuse Viral Video: मंत्री दादा भुसेंनी सिनेस्टाईल पकडला पिकअप, समोर आला धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()