Nashik News: औद्योगिकक्षेत्रात दिवाळीपूर्वी ऑर्डर पूर्ण करण्याची घाई; अनेक कंपन्यांत रात्रपाळी सुरू

Industry Worker
Industry Workeresakal
Updated on

सातपूर : सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये दिवाळीपूर्वी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी घाई असून, येत अनेक लघुउद्योगात कामगारांना जादा तास काम करण्याचीही मुभा दिले आहे.

यानिमित्ताने दिवाळीत पगार व्यतिरिक्त दोन पैसे अधिकचे मिळणार असल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. (Rush to fulfill orders ahead of Diwali in industrial sector Night shift started in many companies Nashik News)

दिवाळी म्हटली की सर्वच क्षेत्रात एकप्रकारे आनंदाचे व आर्थिक भरभराटीचे वातावरण निर्माण असते. त्याच कारण ही तसेच आहे, दिवाळीत अनेक कुटुंब वाहनांबरोबर घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात. त्यामुळे या वस्तूंची मोठी मागणी राहते.

नाशिकमधील ऑटोमोबाईलक्षेत्रातील महिंद्रा अॅन्ड महिंद्रा तसेच इलेक्ट्रॉनिकक्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या मोठ्या प्रमाणावर कंपन्या आहेत. दिवाळीपूर्वी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी एकप्रकारे या कंपन्यांमध्ये स्पर्धाच सुरू असते.

यामुळे मोठ्या कंपन्यांना विविध पार्ट पुरवणारे छोटे लघुउद्योगांना मात्र याची चांगलीच कसरत करावी लागत आहे. अनेक लघुउद्योगात जनरल किंवा बारा तास काम चालत होते.

Industry Worker
NMC Hospital Recruitment: दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा प्रतिसाद नाहीच!

पण आता दिवाळीत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दुसरी व तिसरी पाळी वाढविल्याने कामगारांना जादा तास काम मिळत आहे.

दिवाळीत पगार व्यतिरिक्त दोन पैसे अधिकचे मिळणार असल्याने कामगार वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

"कोरोनानंतर खऱ्या अर्थाने औद्योगिकनगरी या वर्षी रूळावर आल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. त्यात वाहन व इलेक्ट्रॉनिक बरोबरच इतरही क्षेत्रातील उत्पादनाला चांगली मागणी लक्षात घेता दिवाळीत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी लघुउद्योगांना चांगलीच कसरत करावी लागत आहे." - राजेश गडाख, लघुउद्योजक

Industry Worker
NMC Election News : आधी लोकसभा, मगच महापालिका निवडणुका; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.