NDA Exam : 'एनडीए' परीक्षा केंद्रासाठी नाशिकला हुलकावणी; विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गाठावे लागतंय अन्‍य शहर

NDA Exam
NDA Examesakal
Updated on

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्‍या जाणाऱ्या नॅशनल डिफेन्‍स ॲकॅडमीच्या प्रवेश परीक्षेकरिता नाशिक शहरात केंद्रच देण्यात आलेले नाही. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अन्‍य शहरांत जाऊन परीक्षा द्यावी लागत आहे.

यामुळे त्‍यांची गैरसोय होत आहे. आयोगाकडून नाशिक केंद्रास हुलकावणी दिल्‍याने विद्यार्थी, पालकांकडून नाराजी व्‍यक्‍त होत आहे, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. (Rush to Nashik for NDA Exam Centre Students have to reach other city for exam nashik news)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षांकरिता नाशिकला केंद्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे आयोगाच्‍या काही परीक्षा नाशिकला होऊ लागल्‍या आहेत. परंतु 'एनडीए' सारख्या महत्त्वाच्या परीक्षेला नाशिकमध्ये केंद्र दिले गेले नसल्‍याची माहिती समोर आली आहे.

२०२३ च्‍या सत्रातील पहिली नॅशनल डिफेन्‍स ॲकॅडमी ॲण्ड नेव्‍हल ॲकॅडमी परीक्षा येत्‍या १६ एप्रिलला नियोजित आहे. एनडीएमध्ये मुलींकरिता दारे खुली झालेली असल्‍याने मुलांसोबत मुलीदेखील या परीक्षेला मोठ्या संख्येने प्रविष्ट होत असतात.

नाशिक जिल्‍ह्‍यात यापूर्वी यशस्‍वी विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षात घेता, परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार असे उत्तर महाराष्ट्रातूनही विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात असतात. परंतु आगामी परीक्षेसाठी नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ठाणे, मुंबई, पुणे या शहरांमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे.

त्यामुळे परीक्षेच्‍या एक दिवस आधी परीक्षा केंद्र असलेले शहर गाठावे लागणार असल्‍याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या अन्‍य परीक्षा जर नाशिकमध्ये होऊ शकतात, तर एनडीएची परीक्षा घेण्यात अडचण काय, असा प्रश्‍न पालकांकडून उपस्‍थित केला जातो आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

NDA Exam
Market Committee Election : जिल्ह्यात 72 जागांसाठी निवडणूक; मतदार नसलेल्यांना शेतकरी दाखला आवश्यक

नाशिकला केंद्र असल्‍यास परीक्षार्थ्यांच्‍या संख्येतही वाढ होईल, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी, प्रशासन व आयोगाने लक्ष घालत आवश्‍यक ती कार्यवाही करण्याची मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून केली जाते आहे.

सीडीएस परीक्षेचेही आयोजन

यापूर्वीपर्यंत एनडीए व सीडीएस परीक्षांचे आयोजन वेगवेगळ्या तारखांना केले जायचे. परंतु आता एनडीए परीक्षेच्‍या दिवशीच सीडीएस परीक्षादेखील नियोजित आहे. या परीक्षेला नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने विद्यार्थी सामोरे जातात. त्यामुळे या परीक्षेसाठीदेखील नाशिकमध्ये परीक्षा केंद्र असावे, अशी मागणी आहे.

"एनडीए परीक्षेला नाशिकला परीक्षा केंद्र असावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून प्राप्त झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या अन्‍य परीक्षा नाशिकला होऊ लागल्‍याने या परीक्षादेखील व्‍हाव्यात, यासाठी आग्रही आहोत. यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल."

- हेमंत गोडसे, खासदार.

NDA Exam
Shriram Rathotsav 2023 : रामभक्तांच्या अलोट उत्साहात रथोत्सव! भाविकांची दर्शनासाठी गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.