Nashik Crime : छकुल्या पाठोपाठ घोड्याही स्थानबद्ध; सराईतांवर करडी नजर

Nashik Crime : छकुल्या पाठोपाठ घोड्याही स्थानबद्ध; सराईतांवर करडी नजर
esakal
Updated on

Nashik News : गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार छकुल्या ऊर्फ गणेश वाघमारे याच्यावर दहा दिवसांपूर्वी स्थानबद्धतेची कारवाई केल्यानंतर आता,

घोड्या ऊर्फ सचिन मधुकर तोरवणे (२७, रा. सिद्धेश्वर नगर, जुना सायखेडा रोड, जेल रोड) यालाही एका वर्षासाठी स्थानबद्ध केले असून, त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. (Sachin Torne an innkeeper for serious crimes was remanded for one year nashik crime)

शहरात काही दिवसांपासून सराईत गुन्हेगारांनी डोके वर काढले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून धडक कारवाई सुरू केली आहे.

४ मेस गंभीर गुन्हे दाखल असलेल्या छकुल्या ऊर्फ गणेश वाघमारे याच्याविरुद्ध कारवाई करताना त्यास एका वर्षांसाठी स्थानबद्ध करीत त्याची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Crime : छकुल्या पाठोपाठ घोड्याही स्थानबद्ध; सराईतांवर करडी नजर
Nashik Bribe Crime : डॉ. वैशाली पाटीलकडे मिळाले 81 तोळे सोने

त्यापाठोपाठ शहर आणि परजिल्ह्यातही गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सचिन ऊर्फ घोड्या मधुकर तोरवणे याच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

२०१९ मध्येही घोड्या याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती. परंतु, त्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये कमी झाल्या नाहीत.

त्याच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाणे आणि धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्यात शांततेचा भंग, दहशत माजविणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दरोडा, विनयभंग, दंगा करणे, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहे. पोलिस आयुक्तांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, येत्या काही दिवसात आणखी सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेसह तडीपारीच्या कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत शहर पोलिसांनी दिले आहेत.

Nashik Crime : छकुल्या पाठोपाठ घोड्याही स्थानबद्ध; सराईतांवर करडी नजर
Nashik Cyber Crime : सावधान! अनोळखी व्हिडिओ कॉल टाळा; अन्यथा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.