नाशिक : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत १०८ रुग्णवाहिकेतून गरोदर महिलेला (Pregnant women) हलविताना प्रवासातच तिची सुरक्षित प्रसूती करण्यात रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि त्यांचे चालक (पायलट) यांना यश आले. प्रसूतिपूर्व बाळाच्या अवतीभोवती जेमतेम दोन टक्केच पाण्याचे प्रमाण असल्याने अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टरांनी जबाबदारी घेत अवघड प्रसूती यशस्वी केली.
डॉक्टर, चालकाच्या यशस्वी प्रयत्नांचे कौतुक
येवला येथील १०८ रुग्णवाहिकेतील डॉ. बाबासाहेब साताळकर व पायलट (चालक) मधुकर येवले यांनी एकूण परिस्थितीचे गांभीर्य ओळखत योग्य निर्णय घेतल्यामुळे माता आणि बालक सुरक्षित राहिले. रविवारी (ता. २०) सकाळी नऊला येवला ग्रामीण रुग्णालयातून १०८ रुग्णवाहिकेला जिल्हा रुग्णालयात अति तत्काळ प्रसुतीसाठी महिलेला नेण्याचा कॉल आला. त्यानुसार डॉ. साताळकर व पायलट येवले तेथे पोचले. ताईबाई दीपक आहिरे (२४, रा. येवला) या गर्भवतीला रुग्णवाहिकेत शिफ्ट करून प्राथमिक निरीक्षणाखाली ठेवून नाशिककडे प्रवास सुरू केला. त्यांना पुन्हा शालिनी वाघ नावाची दुसऱ्या गर्भवती महिला किचकट स्थितीत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा दुसरा कॉल आला. दोन्ही गर्भवतींना घेऊन ते निफाडहून नाशिकला निघाले असताना औरंगाबाद मार्गावर रामाचे पिंपळस भागात मात्र बाका प्रसंग उद्भवला. ताईबाई आहिरे यांची प्रसूती प्रक्रिया सुरू झाल्याचे लक्षात आल्यावर रस्त्यालगत रुग्णवाहिका थांबवीत डॉ. साताळकर यांनी प्रसूतीचा निर्णय घेतला.
अडचणींवर मात
प्रसूती दरम्यान बाळाच्या भोवती पाण्याचे प्रमाण जेमतेम दोन टक्केच असल्याचे लक्षात आल्यानंतर हार न मानता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवत सुखरूप प्रसूती केली. बाळाची सुश्रृषा करत रुग्णवाहिकेत उपलब्ध सक्शन मशिनद्वारे बाळाच्या नाका-तोंडातील पाणी काढले. तेथेच मसाज केली. त्यानंतर दहा मिनिटांनंतर बाळ रडायला लागले. बाळ व आई सुखरूप असल्याने त्यांना चांदोरी रुग्णालयात दाखल केले. एक प्रसूती सुखरूप करीत असताना रुग्णवाहिकेतील दुसऱ्या गर्भवतीच्या बाळाचा नाळ गर्भ पिशवीजवळ अडकला असल्याने लागलीच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.