Safe Seminar | संतती सुखासाठी आई-बाबांची समान जबाबदारी : डॉ. मालविका तांबे

डॉ. मालविका तांबे
डॉ. मालविका तांबे esakal
Updated on

नाशिक : गर्भधारणा होत नसल्‍याने वंध्यत्‍वाबाबत बहुतांश वेळा केवळ महिलांनाच उपचाराचा आग्रह केला जातो. परंतु गर्भधारणेपूर्वीपासून बाळाला जन्‍म देईपर्यंत आई व बाबा दोघांची समान जबाबदारी असते.

बाळातील गुण व दोषांकरिता दोघे समान जबाबदार असल्‍याने संतती सुखाचा विचार करताना आई-बाबा दोघांचे आरोग्‍य सुदृढ असणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन डॉ. मालविका तांबे यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित परिसंवादात त्‍या बोलत होत्‍या. (Safe Seminar Dr. Malvika Tambe guidance Equal responsibility of parents for the happiness of offspring In-depth guidance to attendees through seminars Nashik News)

डॉ. मालविका तांबे
Nashik News : करवाढीवरून राज्य शासनाची कोंडी

डॉ. तांबे म्‍हणाल्‍या, की सर्वांत महत्त्वा‍चा ठेवा आपण आपल्‍या गुणसूत्रातून बालकांपर्यंत पोचवत असतो. त्‍यामुळे जन्‍मणारे बाळ सुदृढ असावे, याकरिता आयुर्वेद पद्धतीत आई-बाबा या दोघांवर उपचार केले जातात.

संतुलन आयुर्वेद फर्टिलीटी एक्‍सपिरियन्‍स (सेफ)च्‍या माध्यमातून बीजांची शुद्धी केली जाते. आहार-विहारांतून वर्षानुवर्षे शरीरात निर्माण झालेले दोष दूर करत ते बाळामध्ये हस्‍तांतरित होण्यापासून रोखले जातात.

आहार, निद्रा ब्रह्मचर्य यांचे उचित संतुलन साधण्यासाठी समुपदेशन केले जाते. त्‍यामुळे केवळ संतती सुखप्राप्तीने समाधान बाळगण्यापेक्षा बाळाच्‍या तब्‍येत, वागणूक, कर्तृत्‍वातून झळाळी उमटावी यासाठी ‘सेफ’ अत्‍यंत प्रभावी माध्यम आहे. या उपचारप्रक्रियेतील पंचकर्मातून रस धातू ते शुक्र धातू या दरम्‍यानची साखळी सुस्‍थितीत आणली जाते.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

डॉ. मालविका तांबे
Jalgaon News : भूषण शेवरेच्या खुनातील दोन संशयितांना अटक

बाळाला सोनं चाखायला

जवळ वडील हवेच

डॉ. तांबे म्‍हणाल्‍या, की सामान्‍यतः आजही प्रसूती माहेरकडे होत असते. या परिस्‍थितीत बदल होणे गरजेचे आहे. सासर-माहेर हा बोध चुकीचा असून, दोन्‍ही कुटुंबाकडून पाठबळ मिळाले पाहिजे. बाळाचा जन्‍म झाला तेव्‍हा त्‍याला वडिलांनी सोनं चाखायला देणे ही परंपरा असून, त्‍यास आयुर्वेदामध्ये मोठे महत्त्‍व आहे. त्‍यामुळे या आनंदाच्‍या क्षणी वडील तेथे हवेच.

अनेक जोडप्‍यांना

अल्‍पावधीत फायदा

डॉ. तांबे म्‍हणाल्‍या, की श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्‍या पन्नास वर्षांच्‍या प्रदीर्घ संशोधनावर आधारित हजारो वर्षांच्‍या भारतीय आयुर्वेदाने सिद्ध केलेली ‘सेफ’ या यशस्‍वी उपचार पद्धती कार्ले येथील केंद्रातून अनेक दांपत्‍यांनी यशस्‍वीरित्‍या पूर्ण केलेली आहे. अगदी पहिल्‍या महिन्‍यापासून अनेकांना सकारात्‍मक परिणाम जाणवलेले आहेत. अल्‍पावधीत फायदा झालेल्‍या जोडप्‍यांची संख्या मोठी आहे. सुमारे ६० ते ६५ टक्‍के जोडप्‍यांना फायदा झालेला असून, अन्‍य उपचार पद्धतींच्‍या तुलनेत हा निकाल कितीतरी अधिक असल्‍याचे समाधान त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

डॉ. मालविका तांबे
Jalgaon News : भूषण शेवरेच्या खुनातील दोन संशयितांना अटक

प्रश्‍नोत्तरांतून शंकांचे निरसन...

कार्यक्रमादरम्‍यान उपस्‍थितांना त्‍यांच्‍या मनातील शंकांचे निरसन प्रश्‍नोत्तरांतून करण्यात आले. मातृत्‍वापासून तर एकंदरीत सुदृढ जीवनशैलीकरिता आयुर्वेदशास्‍त्राचा आधार कशा पद्धतीने घ्यावा, याबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. यापैकी काही प्रश्‍न व त्‍यांची मान्‍यवरांनी दिलेली उत्तरे..

प्रश्‍न ः उतारवयात शरीराला चालते-फिरते मेडिकल बनविण्याऐवजी आयुर्वेदाचा आधार कसा मिळू शकतो?

सुनील तांबे ः आयुर्वेद उपचार पद्धतीत कुठलाही शॉर्टकट नसून, शिस्‍तबद्धपणे पूर्ण उपचार घेतल्‍याने त्‍यांचे चांगले परिणाम दिसतात. त्‍यामुळे शास्‍त्रोक्‍त उपचार घेणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. आयुर्वेद शास्‍त्रात मोठे संशोधन झालेले असून, त्‍याचा लाभ घेत सुदृढ व निरोगी जीवन जगता येऊ शकते.

प्रश्‍नः मला स्‍लीपडिस्‍कचा त्रास आहे, मातृत्‍वाचा विचार करताना

आधी पंचकर्म करण्याची इच्‍छा आहे. अपेक्षित पाठबळ मिळत नाही आहे. काय करायला हवे?

डॉ. मालविका तांबे ः आई-बाबा दोघांची समान जबाबदारी व समान अधिकार आहेत. स्‍लीपडिस्‍कचा त्रास असल्‍याने आईला भविष्यात मणके विकार उद्‌भवू शकतात. सुदृढ बाळासाठी पंचकर्म करून घेणे हा आईचा हक्‍क असून, त्‍यासाठी कुटुंबीयांनी त्‍यांना पाठबळ द्यायला हवे.

डॉ. मालविका तांबे
Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

प्रश्‍नः नोकरीनिमित्त मुंबईला वास्‍तव्‍याला आहे. गर्भधारणेचा विचार करताना किंवा एकंदरीत सुदृढ जीवनशैलीसाठी काय काळजी घ्यावी, कसे नियोजन करावे?

डॉ. मालविका तांबे ः आपल्‍यातील गुणसूत्र बाळामध्ये हस्‍तांरित होत असल्‍याने सर्वांत आधी आपल्‍यातील बिघाड दुरुस्‍त करावे. त्‍यासाठी किमान तीन महिने कालावधी आवश्‍यक असून, त्‍याअनुषंगाने नियोजन करावे. सामान्‍यतः सुदृढ जीवन जगण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला, फळे घेताना श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी सांगितल्‍याप्रमाणे ध्यानधारणा केल्‍यास सकारात्‍मक परिणाम जाणवतील.

प्रश्‍न ः पाच वेळा आयव्‍हीएफ अयशस्‍वी झाले? मातृत्‍वाचे सुख मिळू शकेल का?

डॉ. मालविका तांबे - ‘सेफ’च्‍या माध्यमातून सर्वांत आधी सकारात्‍मक विचार रुजविला जात असतो. चाचण्यांतून योग्‍य प्रकारे निदान करून वैयक्‍तिक पातळीवर उपचाराची दिशा ठरविली जाते. आयव्‍हीएफ अयशस्‍वी झालेल्‍या अनेक दांपत्‍यांना यापूर्वी ‘सेफ’च्‍या माध्यमातून यश आलेले आहे. त्‍यामुळे आशावादी राहून आपणही उपचार पूर्ण करावा.

प्रश्‍न ः पंचकर्म वयाच्‍या कुठल्या वर्षी करावे? कुठल्‍या ऋतूत करावे?

डॉ. मालविका तांबे ः वयाच्‍या चाळिशीनंतर शरीराची स्‍वच्‍छता करणे गरजेचे होते. प्रथमच करत असाल तर पंचकर्म कुठल्‍याही ऋतूत करता येऊ शकते. जशी आपण दिवाळीत घराची स्‍वच्‍छता करतो, त्‍याप्रमाणेच या माध्यमातून आपण शरीराची स्‍वच्‍छता करतो. महिला मंडळांनी किटी पार्टी, सहलींना जाता त्‍याप्रमाणे पंचकर्मासाठी केंद्रात यावे. महिलेचे चांगले आरोग्‍य राहिले तर कुटुंबाचेही आरोग्‍य चांगले राखता येईल.

डॉ. मालविका तांबे
Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

प्रश्‍नः लग्‍नाला चार वर्षे झाली, आधी गांभीर्याने घेतले नव्‍हते; परंतु आता संतती सुख हवे आहे, त्‍यासाठी काय करावे? सेफ उपचार पद्धती कशी असते?

डॉ. मालविका तांबे ः अनेक जण वंध्यत्‍वाबाबत मोकळेपणाने बोलायलादेखील तयार होत नाहीत. याबाबत समाजात जागृता निर्माण झाली पाहिजे. संतुलन पंचकर्म, स्‍वास्‍थ संगीत, योगासन अशा विविध माध्यमातून दोष शुद्धीनंतर ‘सेफ’च्‍या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणेसाठी मार्गदर्शन, समुपदेशन केले जाते.

प्रश्‍नः मेनोपॉजनंतर महिलामध्ये उद्‌भवणाऱ्या शारीरिक, मानसिक समस्‍यांचा आयुर्वेदच्‍या सहाय्याने कसा सामना करावा?

डॉ. मालविका तांबे ः महिलांनी आरोग्‍याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आत्‍मप्राश, धात्री रसायन यांसारख्या घटकांतून शरीराला पौष्टिक घटक मिळू शकतात. ध्यानधारणा, योग, प्राणायाम यांच्‍या माध्यमातून मेनोपॉजचे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतात.

प्रश्‍नः फॅमिली प्‍लॅनिंग करताना आता गर्भधारणा होत नाही आहे, काय करावे?

डॉ. मालविका तांबे ः कधी संतती सुख प्राप्त करावे, हा त्‍या दांपत्‍यांचा प्रश्‍न असतो. परंतु फॅमिली प्‍लॅनिंग करताना अनेक चुका घडतात. त्‍यामुळे भविष्यातील धोके वाढतात. गर्भपात करताना आपण शरीराला नकारात्‍मक संदेश देत असतो. सहाजिकच त्‍याचे नकारात्‍मक परिणामदेखील जाणवतात. परंतु तरीदेखील क्षमता असेल तर गर्भधारणा होऊ शकते. त्‍यासाठी 'सेफ' उपचार पद्धतीतून योग्‍य तपासण्या व उपचार घ्या.

डॉ. मालविका तांबे
Jalgaon News : कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची तब्बल 7 लाख 60 हजारांत फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.