Sai Baba Palkhi : साईपालख्यांनी दुमदुमला महामार्ग! महिलांचा सहभाग लक्षवेधी

Sai Baba Palkhi
Sai Baba Palkhi esakal
Updated on

इगतपुरी : रणरणते ऊन, जिवाची काहिली करणारे तापमान आणि उन्हाच्या झळांनी लाहीलाही होत असतानाही समस्त मुंबईकरांचे आराध्य दैवत म्हणून ओळख असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या ३० मार्चला साजऱ्या होणाऱ्या रामनवमी तथा साई जन्मोत्सवासाठी जाणाऱ्या साईभक्तांची मुंबई आग्रा महामार्गावर गर्दी उसळली आहे.

भाविक व पालख्यांनी महामार्ग अक्षरशः फुलला असून साईनामाच्या गजराने व भक्तीमय वातावरणाने दुमदुमला आहे.

Sai Baba Palkhi
Shirdi : भाविकाकडून साईबाबा मंदिराला 33 लाखांचा हिरेजडित सोन्याचा मुकुट दान

मुंबई व उपनगरांच्या परिसरातून शेकडो साई पालख्या शिर्डीकडे रवाना झाल्याने मुंबई- आग्रा महामार्ग व त्याबरोबरच घोटी - सिन्नर शिर्डी हा महामार्ग साईभक्त पदयात्रेकरूंनी खुलून गेला आहे.

हजारो साईभक्त, महिलाभक्त व युवा वर्गाचाही यात समावेश आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता साई भक्त 'तुला खांद्यावर घेईन','साई बाबा बोलो, साई बाबा बोलो', मेरे बाबा के हातो मे जादू का पाणी','अनंत कोटी ब्रम्हांडनायक'अशा नानाविध गीत, भजन, संगीत, कीर्तन, गीतगायन करीत भक्तीमय वातावरणात मार्गक्रमण करीत आहेत.

मुंबई परिसरातील भाईदंर, विरार, नालासोपारा, घाटकोपर, दादर, मालाड, वसई, कल्याण, घोडबंदर, कळवा, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, कांदिवली, आदी मुंबईच्या उपनगरातून पदयात्री मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.

Sai Baba Palkhi
Shirdi : साईंच्या झोळीत अठरा कोटींचे दान

यात महिलांचा सहभाग यंदा लक्षवेधी ठरला आहे. महामार्गावरुन जवळपास लाख ते सव्वालाख पदयात्री मार्गक्रमण करीत असल्याने महामार्ग अक्षरशा रंगीबेरंगी रंगानीं फुलल्याचे चित्र दिसून येत आहे.

या साईपदयात्रा पालख्यासोबत आकर्षक साईरथ दिसून येत आहेत. साईंच्या महाकाय मूर्ती, साईरथांना आकर्षक रोषणाई हे साईरथांचे खास आकर्षण लक्षवेधी ठरत आहेत. त्यातच शिर्डीकडे रवाना झालेल्या पालख्यामध्ये साईंच्या रथाला आकर्षक देखावे सादर करण्यात आल्याने विविध रथ पाहण्यासाठी गावागावात आकर्षण ठरत आहे.

वृक्ष, पाणी व लेक वाचवाचा जागर

साई पालखींसमवेत हजारो भाविक मार्गक्रमण करीत आहेत. एका पालखीसमवेत दहा ते बारा वाहनांचा ताफा असतो. अशा शेकडो वाहनांवर वृक्ष वाचवा, झाडे जगवा, पाणी जीवन है, जल है तो कल है, लेक वाचवा, बेटी बचाव असे जनजागृती विषयक संदेश या सगळ्या वाहनावर टाकलेले दिसून येत आहेत. एक प्रकारे समाज प्रबोधनाचे कार्य या पालख्यांमधून होत आहे

Sai Baba Palkhi
Sai Baba Mantra: गुरुवारी करा साईबाबांच्या 'या' मंत्राचा जप, पैशाचा पडेल पाऊस

उत्साह आणि नाराजी

साईभक्तांना मुंबईहून येताना साईदर्शनाची मोठी आस लागून असल्याने साईभक्त उत्साहात गतीने मार्गक्रमण करतात, मात्र घोटीपासून शिर्डीकडे जातानाचा रस्ता अतिशय खराब झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. घोटी सिन्नर महामार्गावर धुळीचे साम्राज्य व जागोजागी खड्डे असल्याने साईभक्तांना चालताना खूपच त्रास होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.