खानदेशात पूर्ण क्षमतेने स्वतंत्र आवृत्ती म्हणून ‘सकाळ’ची मुहूर्तमेढ रोवण्याला आज अठरा वर्षे पूर्ण होतायत. स्पर्धेच्या युगात अत्याधुनिकतेची कास धरून, काळाचे बदल तत्परतेने स्वीकारत भविष्याचा वेध घेणारे दैनिक म्हणून ‘सकाळ’ने जो लौकिक प्राप्त केलाय, तो केवळ वाचकांच्या नि:संदिग्ध पाठबळावर.
विश्वासार्ह पत्रकारितेचा आदर्श घालून देत, सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासत ‘सकाळ’ची द्विदशकाकडे आश्वासक वाटचाल सुरू झालीय. (sakal Anniversary Editorial promising bi decade movement in Khandesh by dr rahul ranalkar nashik Latest marathi article)
सातपुड्याच्या निसर्गदत्त वैभवाने वेढलेला प्रदेश म्हणून खानदेशची ओळख. कापूस, केळी, मका ही या भागातील मुख्य पिके. केळी उत्पादनात जळगाव जिल्ह्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. इथल्या केळीच्या गोडव्याला जगभरात मागणी आहे, म्हणून निर्यातक्षम केळी हे आपल्या भागाचे वैशिष्ट्य.
सोन्याची शुद्धता अन् या व्यवसायातील विश्वासार्हतेला देशात तोड नाही, म्हणून ‘सुवर्णनगरी’ म्हणूनही जळगावचा देशच नव्हे तर जगभरातील भारतीयांकडून गौरव केला जातो.
या सोन्यासारख्या प्रदेशात वाचकांच्या पसंतीची, समाजाची गरज ओळखून ‘सकाळ’ने माध्यम म्हणून चोख भूमिका बजावण्याचा निर्धार केला. खानदेशात पूर्ण क्षमतेने आणि छपाईच्या यंत्रणेसह स्वतंत्र खानदेश आवृत्ती अठरा वर्षांपूर्वी सुरू झाली.
या अठरा वर्षांच्या वाटचालीत दर्जेदार लेखन, स्वत:ची आदर्श आचारसंहिता पाळत ‘सकाळ’ने वाचकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले. अडचणीच्या काळातही प्रतिकूल स्थितीवर मात करत केवळ वाचकांना काय हवे, समाजाची मागणी काय आहे, हे ओळखून प्रबोधनपर लेखनावरच अधिक भर दिला.
सकारात्मक पत्रकारितेचा आदर्श घालून देताना समाजात जे-जे चांगले त्या सर्व विषयांना केवळ भक्कम पाठबळच दिले नाही, तर अशा विषयांना व घटकांना वेळोवेळी उत्स्फूर्त प्रोत्साहनही दिले.
हे करत असतानाच वाईट प्रवृत्तींवर कठोर प्रहार करण्यात ‘सकाळ’ कधी मागे हटला नाही. म्हणूनच खानदेशात वाचकांचा विश्वास संपादन करण्यासह ‘सकाळ’ त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला.
समाजाच्या अनुषंगाने मजकूर देताना प्रत्येक वयोगट, प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून त्यांना नित्य दिनचर्येत उपयोगी पडेल, अशा प्रकारच्या लेखनावर ‘सकाळ’चा भर राहिला. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योग, व्यवसाय, क्रीडा या सर्व क्षेत्रांना स्पर्श करताना प्रत्येक क्षेत्रातील बदलांचा आढावा घेत या माध्यम समूहाने आपले कर्तव्य बजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय.
माध्यम समूह म्हणून या सर्व गोष्टी करत असताना ‘सकाळ’ने अंगीकारलेला सामाजिक बांधिलकीचा वसाही कायम प्राधान्याने जोपासला आहे. सातपुड्यातील वृक्षसंवर्धनाची मोहीम असो, जलदिंडी असो, चाळीसगाव तालुक्यातील जलसंवर्धनाची चळवळ असो की, नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी ‘रिलीफ फंड’द्वारे गरजूंपर्यंत पोचविण्यात येणारी मदत असो;
अशा सर्वच आघाड्यांवर ‘सकाळ’ने सेवाभावाचे आदर्श उदाहरणही घालून दिलेय. म्हणूनच खानदेशात ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वाटचालीचा आढावा घेताना या सर्व बाबींचा ऊहापोह करणे गरजेचे ठरते. या प्रवासात वाचक, विक्रेते, जाहिरातदार, हितचिंतक अशा सर्वच समाजघटकांनी दर्शविलेला विश्वास, प्रेम हे ‘सकाळ’साठी अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. यापुढेही ही सर्व मंडळी आमच्याप्रति असलेली विश्वासार्हता कायम ठेवून स्नेह वृद्धिंगत करेल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही.
-डॉ. राहुल रनाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.