Sakal Book Publication : जगण्याची नवी दृष्टी देणारे ‘पंख सकारात्‍मकतेचे’ पुस्‍तक : सचिन खेडेकर

Sakal Prakashan published by Dignitaries during the release of Dr.Hemant Ostwal books 'Pankh Sakaratmakteche' on Saturday
Sakal Prakashan published by Dignitaries during the release of Dr.Hemant Ostwal books 'Pankh Sakaratmakteche' on Saturdayesakal
Updated on

Sakal Book Publication : सकारात्‍मकता हा बोलण्याचा, वागण्याचा विषय असला तरी त्‍यावर लिहिणे सोपे नाही. कठीण प्रसंगही वाचताना चेहऱ्यावर हसू येईल, असे ओघवते लिखाण डॉ. हेमंत ओस्‍तवाल यांनी केले आहे.

त्‍यांचे ‘पंख सकारात्‍मकतेचे’ हे पुस्‍तक अनेकांना जगण्याची नवी दृष्टी देणारे ठरेल, असे प्रतिपादन ज्‍येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी शनिवारी (ता. १६) केले. त्र्यंबकेश्‍वर रोडवरील फ्रावशी अॅकॅडमी येथील सभागृहात ‘सकाळ प्रकाशन’ प्रकाशित व डॉ. हेमंत ओस्‍तवाल लिखित ‘पंख सकारात्‍मकतेचे’ पुस्‍तकाच्‍या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. (Sakal Book Publication pankh sakaratmak teche book published nashik news)

लेखक व सुयश हॉस्‍पिटलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. ओस्‍तवाल, विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार मोर, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, आदिवासी विकास आयुक्‍त नयना गुंडे, आदिवासी विकास महामंडळाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालिका लीना बनसोड, भारतीय जैन संघटनेचे राज्‍याध्यक्ष नंदकिशोर साखला, सॅमसोनाईट इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष यशवंत सिंग, ज्‍येष्ठ अस्थिरोगतज्‍ज्ञ डॉ. विजय काकतकर, फिजिशियन डॉ. विजय घाटगे, ‘सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ‘सकाळ प्रकाशन’चे सरव्‍यवस्‍थापक आशुतोष रामगीर, फ्रावशी स्‍कूलचे रतन लथ आदी उपस्‍थित होते.

अभिनेते खेडेकर म्‍हणाले, की नकारात्‍मकतेच्‍या गर्तेत अडकलेल्‍या व्‍यक्‍तीला कितीही सांगून उपयोग होऊ शकत नाही. आधी त्‍याचा दृष्टिकोन सकारात्‍मक केल्‍यावर मगच सांगितलेली गोष्ट समजते. पुस्‍तकातील कुठलेही पान वाचायला घेतले की याची प्रचीती येते. प्रास्‍ताविकात डॉ. रनाळकर म्‍हणाले, की सध्या बहुतांश नकारात्‍मकतेचे वातावरण असताना, सकारात्मकतेचा अंकुर पेरण्याच्‍या दृष्टीने ही लेखमाला प्रकाशित केली. स्‍वतः अनुभवलेले डॉ. ओस्‍तवाल लिहीत गेल्‍याने ते अधिक वाचनीय बनले.

आता ‘सकाळ प्रकाशन’च्‍या माध्यमातून हे लिखाण व्‍यापक स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचेल.
नयना गुंडे म्‍हणाल्‍या, की मोठ्या अडचणी कशा सुलभतेने सोडविता येऊ शकतात, हे या लेखमालेतून वाचायला मिळाले. त्‍यात डॉ. ओस्‍तवाल यांच्‍या मातोश्रींची व्‍यक्‍तिरेखा सर्वाधिक सकारात्‍मक वाटली. लीना बनसोड यांनी सकारात्‍मक निर्णय घेणे हा एक पर्याय असून, त्‍याचा अवलंब केल्‍याने जीवन बदलू शकते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sakal Prakashan published by Dignitaries during the release of Dr.Hemant Ostwal books 'Pankh Sakaratmakteche' on Saturday
SAKAL Impact: ...अखेर सिव्हिलमधील ‘सिटी स्कॅन’ झाले सुरू! 2 महिन्यांनंतर कार्यान्वित

पुस्‍तकातील प्रत्‍येक प्रसंगात पटकथा दडलेली असून, त्‍यावर आधारित वेबसीरिजची ओटीटी प्‍लॅटफॉर्मवर निर्मिती केली जाऊ शकते, असे सांगितले. यशवंत सिंग म्‍हणाले, की समुद्रातील वादळापेक्षा मनातील वादळ अधिक धोकादायक असते. हे वादळ क्षमविताना, अनेकांच्‍या जीवनात डॉ. ओस्‍तवाल यांनी सकारात्‍मकता आणली. हे पुस्‍तकही अनेकांसाठी जगण्यासाठी प्रोत्‍साहन ठरेल.

डॉ. ओस्‍तवाल म्हणाले, की नियमित लेखक नसताना आयुष्यात घडलेल्‍या घटना लिहीत गेलो. आयुष्याच्‍या प्रवासात अनेक लोक भेटले, त्‍या प्रत्‍येकाकडून काहीतरी शिकायला मिळाले. कुटुंबीयांची खंबीर साथ लाभली. डॉ. घाटगे म्‍हणाले, की मनुष्याला विचार देणारा कुणीतरी हवा असतो. ‘सकाळ प्रकाशन’च्‍या या पुस्‍तकाच्‍या रूपाने अनेकांच्‍या जीवनात सकारात्‍मकतेची पहाट उजाडेल.

डॉ. काकतकर म्‍हणाले, की रुग्‍णांवर उपचार करताना काहींमध्ये अफाट सकारात्‍मकतेचे अनपेक्षित परिणाम दिसतात. याउलट नकारात्‍मकतेमुळे काहींना आजारपणाचा त्रास वाढतो. आजारपणच नव्‍हे, तर जीवनात सकारात्‍मक दृष्टिकोनाला महत्त्व आहे. रतन लथ म्‍हणाले, की काही व्‍यक्‍तींचा सहवास सकारात्‍मकता निर्माण करीत असतो. त्‍यांच्‍यातील ऊर्जा घेताना आपणही आपले आयुष्य समृद्ध केले पाहिजे.

Sakal Prakashan published by Dignitaries during the release of Dr.Hemant Ostwal books 'Pankh Sakaratmakteche' on Saturday
Sakal Exclusive : जीआर झाला, पण आरोग्य संरक्षण योजनेचा निर्णय केव्हा अमलात येणार? लाभार्थी वंचितच

श्री. साखला म्‍हणाले, की लहानपणापासून डॉ. ओस्‍तवाल यांनी शिक्षणाप्रती धडपडीतून सकारात्‍मकतेचे दर्शन घडविले, ते रुग्‍णांवर उपचारांतही कायम ठेवले. अशा प्रकारे समाज उत्थानाचे काम करणाऱ्या या पुस्‍तकाद्वारे प्रोत्‍साहन मिळेल. जिल्‍हाधिकारी शर्मा यांनीही मनोगत व्‍यक्‍त करताना आठवणींना उजाळा दिला.

पोलिस आयुक्‍त शिंदे म्‍हणाले, की वाचकांमध्ये प्रोत्‍साहन निर्माण होईल, असे लिखाण करण्याचे धाडस डॉ. ओस्‍तवाल यांनी यशस्‍वीरीत्या पेलले आहे. या सकारात्‍मकतेची अनुभूती रुग्ण आणि आता वाचकांना अनुभवायला मिळेल. डॉ. शेखर म्‍हणाले, की शब्‍दांना धार असते, शब्‍द अस्‍त्राप्रमाणे असतात. शब्‍दांचा प्रभावी वापर करण्यात लेखकाची प्रगल्‍भता असते. हीच प्रगल्‍भता ‘पंख सकारात्‍मकतेचे’ पुस्‍तक वाचताना जाणवली.

राजेशकुमार मोर म्‍हणाले, की नाशिक शहरात नियुक्‍ती झाल्‍यावर आपण सकारात्‍मक वातावरणात जात असल्‍याचा विचार मनात आला. येथे भेटत गेलेल्‍या माणसांतून हा विचार प्रत्‍यक्षात उतरला. वाचनीय पुस्‍तक देशभरातील वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. ओस्‍तवाल यांनी ‘विंग्‍स ऑफ पॉझिटिव्‍हीटी’चे इंग्रजीतून लिखाण करण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

Sakal Prakashan published by Dignitaries during the release of Dr.Hemant Ostwal books 'Pankh Sakaratmakteche' on Saturday
SAKAL Exclusive: राज्यातील 31 हजार अंगणवाड्या हक्काच्या छताविना!

सुशीला ओस्‍तवाल यांच्‍या हस्‍ते अभिनेते सचिन खेडेकर यांचा सत्‍कार झाला. डॉ. चंद्रकांत संकलेचा आणि प्रियंका पारख यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा ओस्‍तवाल, डॉ. पूजा ओस्‍तवाल-महाडिक व इतर मान्‍यवरांनी प्रमुख पाहुण्यांचे स्‍वागत केले. डॉ. सचिन महाडिक यांनी आभार मानले.

स्‍वतःसाठी अभिनय करतोय...

करिअरच्‍या सुरवातीच्‍या टप्प्‍यात प्रत्‍येक अभिनेत्‍याप्रमाणे मलाही दडपण होते. दिग्‍दर्शक काय म्‍हणतील, निर्मात्‍यांच्‍या अपेक्षा, प्रेक्षकांना अभिनय आवडेल का, असे अनेक प्रश्‍न मलाही पडायचे. परंतु, सुमारे ३५ वर्षांच्‍या अनुभवानंतर आता लोकांसाठी नव्‍हे, तर स्‍वतःच्‍या मनोरंजनासाठी काम करतो, असा अनुभव अभिनेते खेडेकर यांनी सांगितला.

वाचकांपर्यंत पोहोचेल सकारात्‍मकता ः गमे

वार्षिक आरोग्‍य तपासणीच्‍या निमित्ताने नियमितपणे डॉ. ओस्‍तवाल यांच्‍याशी संपर्क येत गेला. प्रत्‍येक भेटीत त्‍यांच्‍यातील सकारात्‍म्‍कता अचंबित करणारी होती. विशेषतः कोरोना महामारीच्‍या सुरवातीच्‍या टप्प्‍यात जेव्‍हा खासगी रुग्‍णालये कोविडसाठी खाटा उपलब्‍ध करून देण्यास तयार नव्‍हती, तेव्‍हा डॉ. ओस्तवाल यांनी दाखविलेली सकारात्‍मकता हजारो रुग्‍णांसाठी दिलासादायक ठरली. आता हीच ऊर्जा वाचकांपर्यंत पुस्‍तकाच्‍या रूपाने पोहोचणार असल्‍याचे मत विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांनी व्‍यक्‍त केले.

Sakal Prakashan published by Dignitaries during the release of Dr.Hemant Ostwal books 'Pankh Sakaratmakteche' on Saturday
Nashik Public Library: सार्वजनिक वाचनालयात डिजिटयाजेशन नावापुरतेच! वाचकांना ग्रंथसंपदा मिळण्यास अडचणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()