Sakal Book Publication: राजमाता जिजाऊ पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन, व्याख्यान

सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील सर्वांना परिचित घटनांचे जंत्रीही देत नाही
Sakal Book Publication Rajmata Jijau
Sakal Book Publication Rajmata Jijau esakal
Updated on

Sakal Book Publication : प्रकाश पवार लिखित ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (ता. २६) होणार आहे. सकाळ प्रकाशन आणि ज्योती स्टोअर्सतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. (Sakal Book Publication Release of Rajmata Jijau book on 26 dec nashik news)

नाशिक येथील सार्वजनिक वाचनालय आवारातील मु. शं. औरंगाबादकर हॉल येथे सायंकाळी सहाला हा कार्यक्रम होणार असून, जिजाऊचे लेखक प्रकाश पवार हेही वाचकांशी संवाद साधतील. प्रकाशन सोहळ्यानिमित्त ४९९ रुपयांचे हे पुस्तक ४०० रुपये किमतीत उपलब्ध आहे.

कार्यक्रमाला मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन बाबूराव ठाकरे, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहुल रनाळकर, ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Sakal Book Publication Rajmata Jijau
Sakal Book Publication : जगण्याची नवी दृष्टी देणारे ‘पंख सकारात्‍मकतेचे’ पुस्‍तक : सचिन खेडेकर

पुस्तकाविषयी

राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील सर्वांना परिचित घटनांचे जंत्रीही देत नाही, तर जिजाऊंची जडणघडण कशी झाली, त्यांनी शिवरायांना कसे घडवले, जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले याचं चित्र ते वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे करते. तसेच जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते.

जिजाऊंच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे. इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्म, भाषा, साहित्य, भूगोल, लोकसंस्कृती अशा विविध अभ्यास शाखांची मर्मदृष्टी घेऊन जिजाऊंच्या जीवनकाळातील घटनांचा घेतलेला आढावा वाचणे, ही एक पर्वणीच ठरते.

Sakal Book Publication Rajmata Jijau
Sahakartirtha Book : सहकारातील कर्तृत्वाची यशोगाथा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()