SAKAL Drawing Competition 2023 : ढोल-ताशांच्या गजरात सप्तरंगी आविष्कारासाठी चिमुरड्यांचे स्वागत

लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात येवल्यात चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत..!
लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात येवल्यात चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत..!esakal
Updated on

येवला : सकाळच्या कोवळ्या किरणांच्या सोबतीने मोकळ्या पटांगणात बसून चिमुकल्यानी कुंचल्यातून देखणा कलाविष्कार सादर करत रंगरेषांचे आकर्षक विश्व कागदावर साकारले... विशेष म्हणजे विद्यालयाच्या पथकाने ढोल-ताशांच्या गजरात या चिमुरड्यांचे अनोखे स्वागत करून या स्पर्धेत अधिकच रंगत भरली.

यासाठी निमित्त ठरले, ते या वर्षीचे ‘सकाळ’तर्फे आयोजित सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेचे...! येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या केंद्रावर शहरातील चिमुकल्यांनी सकाळपासूनच स्पर्धेसाठी गर्दी केली होती. (Sakal Drawing Competition 2023 Kids welcome for draw drawing Nashik News )

लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात येवल्यात चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत..!
SAKAL Drawing Competition 2023 : सटाण्यात चिमुकल्यांनी उधळले कुंचल्यातून सप्तरंग!

प्रारंभी प्राचार्य मनोहर कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चित्रांचे वाटप करण्यात येऊन उद्घाटन करण्यात आले. आदर्श शिक्षक डॉ. प्रसाद कुळकर्णी यांनी ‘सकाळ’च्या या स्पर्धेचा देदीप्यमान इतिहास उलगडवला तसेच ‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

येथील स्वामी मुक्तानंद विद्यालय हे केंद्र असून येथील कलाशिक्षक एस. जी. माळी, संतोष राऊळ हे या स्पर्धेचे विद्यार्थी आहे.

येथील क्रीडाशिक्षक गुलाब सोनवणे यांनीदेखील लहानपणी स्पर्धा दिली आहे. याचमुळे आज झांज पथक व ढोल ताशाच्या गजरात स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. या स्वागताने विद्यार्थी देखील भारावून गेले.

लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात येवल्यात चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत..!
SAKAL Drawing Competition 2023 : रंगरेषांच्या अनोख्या दुनियेची अदभुत सफर

सकाळच्या कोवळ्या उन्हात चिमुकले मघोळका करून बसून आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत असताना दिसणारे दृश्य चित्राइतकेच नैसर्गिक वाटत होते. अनेकांच्या कुंचल्यातून सप्तरंगी दुनियेत दिलेले विषय साकारताना शालेय विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य पणाला लावले.

विद्यार्थी तनमनाने चित्रांच्या दुनियेत रमलेले पाहून चिमुकल्यांच्या कलाविष्काराला उपस्थित पदाधिकारी व पालकांनी दाद दिली. कलाशिक्षक संतोष राऊळ, प्रा.गुलाब सोनवने,अनिल भागवत, प्रा.शरद पाडवी,सुमित पाडवी आदींनी संयोजन केले.

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात येवल्यात चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत..!
SAKAL Drawing competition 2023 : सिन्नरला विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह!

■ अपंगांनी दिला चित्राला आकार

बालचित्रकला स्पर्धा समता प्रतिष्ठानच्या मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात झाली. दिव्यांग कर्णबधिर मुलांबरोबरच सर्वसामान्य मुलांनीही या ठिकाणी येऊन चित्रांमध्ये रंग भरले. विशेषतः दिव्यांगानी मेहनतीने साकारलेले चित्र लक्षवेधी ठरले. ९६ मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. मायबोली विद्यालयाच्या प्रांगणात खुल्या वातावरणात या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे, शिक्षक हेमंत पाटील, सुकदेव आहेर, संतोष कोकाटे, सलिल पाटील, रावसाहेब सोनवणे, हिरामण पगार, बजरंग जेडघुले, मंदा पडोळ, रेखा दुनबळे, विजय जाधव, देविदास पगारे, नितिन कदम आदींनी नियोजन केले.

लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात येवल्यात चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत..!
SAKAL Drawing Competition 2023 : सिडकोत चित्रांच्या दुनियेत रमले बालगोपाल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.