SAKAL Drawing competition 2023 : सिन्नरला विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह!

Students of Kindergarten and Secondary School participating in Sakal drawing  competition 2023
Students of Kindergarten and Secondary School participating in Sakal drawing competition 2023esakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : चिमुकले व पालकांची आवडती चित्रकला स्पर्धा सकाळी मंद गारव्याच्या झुळीत सिन्नर शहरातील केंद्र असलेल्या मविप्र संचालित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात झाली. मुले, पालक, आजी-आजोबा अशा तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा अतिशय दर्जेदार व प्रसन्न वातावरणात झाली. (SAKAL Drawing competition 2023 Sinnar immense enthusiasm of students nashik news)

स्पर्धेसाठी सिन्नर शहरातील लोकनेते शंकराव बाळाजी वाजे विद्यालय, ब. ना. सारडा विद्यालय, चांडक कन्या विद्यालय, एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग, अभिनव बालविकास मंदिर सिन्नर,

होरायझन ॲकॅडमी, मातोश्री सगुनाबाई भिकुसा कन्या विद्यालय, संजीवनी प्राथमिक बालमंदिर, सिन्नर, भिकुसा हायस्कूल, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन एक वेगळीच रोनक आणली.

अतिशय सुरेख व दर्जेदार चित्र रेखाटत व आपल्या हाताच्या कलाकुसरीने त्या चित्रांमध्ये रंग भरीत त्या चित्रात एक जीव ओतून एक अतिशय सुरेख अशी कलाकृती कागदावर साकारली, अशी एकाहून एक दर्जेदार चित्र बघून अनेकांनी स्पर्धेची प्रशंसा केली.

Students of Kindergarten and Secondary School participating in Sakal drawing  competition 2023
SAKAL Drawing Competition 2023 : सकाळ चित्रकला स्पर्धेला जोरदार प्रतिसाद! पाहा Photos

चिमुकल्यांनी हातात पेन्सिल व कागद छोट्या छोट्या हातांनी धरत अतिशय सुरेख, उत्कृष्ट, कलाकुसर करीत एकाहून एक सरस चित्रे काढीत स्पर्धेत भाग घेतला. पालकांनीही चित्रकला स्पर्धा पुढील वर्षी अजून भव्य अशा स्वरूपात अनेक ठिकाणी सुरू करावी, अशी मागणी केली.

पालकांनीही पाल्याला चित्र काढण्यास मदत केली. स्पर्धेसाठी ‘मविप्र’ सरचिटणीस नितीन ठाकरे, संचालक कृष्णाजी भगत यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तहसीलदार एकनाथ बंगाळे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धा यशस्वितेसाठी मुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, रेखा हिरे, बाळासाहेब देशमुख, शरद शेळके, श्रीमती राहणे, निधी मिश्रा, डॉ. पी. व्ही. रसाळ, अरुण गायकवाड, उदय कुदळे, संतोष जगताप, वृषाली लोंढे, श्रीमती गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

कलाशिक्षक रमेश तुंगार, छाया खालकर, तृप्ती पगार, मिलिंद डावरे, राहुल मुळे, माधुरी केदारे, राहुल दौंड, विकास बैरागी, सतीश आठवले, संतोष गायकवाड, शरद शिंदे, राहुल चव्हाण, प्रवीण उगले, प्रज्ञा खताळे, प्रीतम चव्हाण, अर्चना काशीद, शीतल देवरे, कविता कदम, प्रतिभा पवार, संगीता शिंदे, विजय सावंत, प्रज्ञा खताळे, मीनल फळे आदींनी स्पर्धा यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Students of Kindergarten and Secondary School participating in Sakal drawing  competition 2023
नारोशंकराची घंटा : रक्त म्हणजे पाणी वाटते का!

"आज दोन वर्षांनंतर सकाळ चित्रकला स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी खूप दिवसांपासून सर्व वाट बघत होतो. अनेक पिढ्यांपासून या स्पर्धेने अनेकांना प्रोत्साहन देत एक नवी दिशा दिली आहे. आजही ‘सकाळ’च्या स्पर्धेबद्दल अभिमान असून आम्ही सर्व या स्पर्धेत भाग घेत असतो. माझ्या कन्येने या स्पर्धेत भाग घेतला. त्यामुळे तिच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल हे नक्की."
- किशोर सहाणे, पालक

"आम्ही वयाच्या ६५ ते ७० या वयात पदार्पण करीत असून, आमच्या नातवांना या स्पर्धेविषयी कुतूहल निर्माण होते. आज या स्पर्धेमुळे त्यांच्यातील चित्रकलेतील कलाकाराला प्रोत्साहन मिळून त्यांची कलाकृती ही आज त्यांच्या हातातून कागदावर नक्कीच दिसेल व या मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन ते नक्कीच निसर्गाशी एकरूप होतील."- केशरबाई गडाख आजी

"मी दहावीत असून, ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेविषयी कुटुंबीयांकडून बरेच ऐकले होते. स्पर्धेविषयी मनात अनेक प्रश्न होते; पण ज्यावेळी स्पर्धेची माहिती हातात पडली व कागदावर चित्र रेखाटले ती अनुभूती दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत नाही. अतिशय योग्य नियोजन व चांगल्या विषयांना हात घालत या स्पर्धेने सिन्नर शहरात उच्चांक गाठला."- सृष्टी कासार, विद्यार्थिनी

Students of Kindergarten and Secondary School participating in Sakal drawing  competition 2023
Shivputra Sambhaji Mahanatya : शिवपुत्र संभाजी महानाट्यासाठी जादा बस; जाणून घ्या वेळापत्रक

"मी सकाळ चित्रकला स्पर्धेत अनेक वर्षांपासून भाग घेत आहे. शाळेत असतानाही मला कायम उत्सुकता असायची. उत्कृष्ट चित्र काढणे, मला आवडते. माझा व्यवसाय कलाकृतीचा असून, या स्पर्धेने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. आजही मी या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट चित्रकलेचा नमुना सादर करणार आहे."- नितीन शिंदे, पालक

"सकाळ माध्यम समूहातर्फे अनेक वर्षांपासून चित्रकला स्पर्धा होत आहे. ३०० पेक्षा जास्त शाळांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. हे खूपच सुंदर व कौतुकास्पद आहे. ‘सकाळ’ दैनिक नसून विद्यार्थीचा मित्र आहे. चित्रकला स्पर्धा सहा गटांमध्ये घेऊन लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आपली कला सादर दाखविण्याचा आनंद मिळाला आहे."

- विवेक मोरे, पालक

Students of Kindergarten and Secondary School participating in Sakal drawing  competition 2023
Shiv Sena Meeting : शुभांगी पाटील यांच्यासाठी शिवसेनेची मुंबईहून कूमक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.