SAKAL Exclusive : सेवानिवृत्तीसह नव्या पदनिर्मितीमुळे राज्यातील शाळेत ५० हजारावर शिक्षक भरतीची गरज आहे. यातील ३० पदे पोर्टलद्वारे भरण्याची घोषणा करून अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ही घेण्यात आली असून त्या परीक्षेचा निकालही लागला आहे.
आता पुढील भरती प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. तीन -चार वर्षांपूर्वीच्या पदभरतीचे गुऱ्हाळ अजून सुरू असून आत्तापर्यंत आठ हजार रिक्त पदांची पदभरतीची कार्यवाही झाली आहे.
त्यामुळे ३० हजार शिक्षक भरतीला मुहूर्त केव्हा लागणार हा प्रश्न असून संचमान्यता निश्चित झाल्यावरच प्रक्रिया सुरू होणार आहे. भरतीचे विविध टप्पे पाहता यासाठी नवे वर्ष उजाडण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. (SAKAL Exclusive 30 thousand teacher recruitment Consensus barrier to recruitment through portals nashik news)
जून अखेरपर्यंत पोर्टलद्वारे शिक्षक भरती होऊन विद्यार्थ्यांना नवे गुरुजी मिळतील, अशी चर्चा होती. मात्र शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्य शिक्षण विभागाला दिलेल्या एका पत्रानुसार शिक्षक भरतीचे टप्पे समोर आले आहे.
त्यानुसार ऑगस्टनंतरच भरतीला सुरवात होणार आहे. मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने अनेक शाळांतील पदे रिक्त असून याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीवर होत आहे.
त्यामुळे शाळांना नवे गुरुजी भेटताना मोठी प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते. शासनाने ३० हजार शिक्षक पदांची भरती जाहीर केली असून यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन निकालही जाहीर करण्यात आला आहे.
या पुढील काळात पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर रिक्त पदांसाठीच्या जाहिराती घेण्यात येणार असून त्यानंतर उमेदवारांची नियुक्तीच्या शिफारशीसाठी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आता लक्ष संचमान्यतेवर
२०१९-२० पासून शाळांच्या संच मान्यता झालेल्या नाही. या काळात प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी आधारचा आधार घेऊन शिक्षक निश्चितीसाठी संच मान्यता करण्यात येणार आहे.
शाळात विद्यार्थी वैद्यतेची कार्यवाही सध्या सुरू असून संच मान्यता १५ मे पर्यंत अंतिम केल्या जाणार आहेत. त्यानंतर संस्थांकडून त्यांच्याकडील शिक्षक पदाची बिंदू नामावली प्रामाणिक करून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याच्या सूचना होतील.
त्यानंतरच संभाव्य नियोजन शिक्षण विभागाने निश्चित केले असून २० ऑगस्टपर्यंत पोर्टलवर पहिल्या तिमाहीकरिता पदभरतीसाठीची कार्यवाही होणार आहे, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच व्यवस्थापन म्हणजे संस्था व शिक्षण विभागाकडून शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया होऊन टप्प्याटप्प्याने शिक्षक भरती होऊ शकेल.
सध्याचा व यापूर्वीचा वेग बघता ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नवे वर्ष किंबहुना नवे नवीन शैक्षणिक वर्ष देखील उजाडेल असा अंदाज आहे.
१२ पैकी भरले ८ हजार शिक्षक
यापूर्वी चार वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक पद भरतीतील जाहिरातीत १२ हजार ७० पदे भरायची होती. यातील पद भरतीमध्ये मुलाखतीशिवाय पाच हजार ९७० उमेदवारांची शिफारस झालेली आहे,
तर मुलाखतीसह पदभरती मध्ये १ हजार ९३३ रिक्त पदांची शिफारस झालेली असून एकूण ७ हजार ९०३ रिक्त पदभरतीची कार्यवाही झालेली आहे तर १९६ संस्थांत एसइबीसी आरक्षणामुळे निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याने ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मे मध्ये उमेदवार उपलब्ध होणार आहे.
याद्वारे ७६९ रिक्त पदे भरली जातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंदाजे ७५० रिक्त पदे भरली जाणार आहे. मागील भरतीचे १ हजार ५०० तसेच आत्ता झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार पदभरतीचे शासनाचे नियोजन आहे. औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका दाखल असून यामुळे पद भरतीचे नियोजन शिक्षण विभागाने दिले आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
असे असतील भरतीचे टप्पे
■ कार्यरत शिक्षकांची संचमान्यता अंतिम करणे - १५ मेपर्यंत
■ शाळानिहाय अंतिम संचमान्यता वितरण - २० मेपर्यंत
■ संचमान्यतेतील मंजूर पदानुसार पदभरतीची कार्यवाही सुरु
■ व्यवस्थापनांच्या शिक्षक पदांची बिंदुनामावली प्रमाणित करणे - ३० जूनपर्यंत
■ व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर देणे - १५ जुलैपर्यंत
■ उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे - २० ऑगस्टपर्यंत
■ उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे,नियुक्तीसाठी शिफारस करणे - २० ऑगस्टपर्यंत
■ या काळातच दुसऱ्या तिमाहीकरिता शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे.
"अनेक शाळात शिक्षकांची खूप पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने भरतीची प्रक्रिया गतिमान व्हावी.पदभरतीसाठी संचमान्यता आवश्यक आहे पण विद्यार्थी आधार मिसमॅच असल्याने सरल पोर्टलवर अपडेटला अडचणी येत आहेत.त्यामुळे शिक्षण विभागाने आधार अपडेट पूर्ण करण्यासाठी पर्याय शोधावा म्हणजे संच मान्यता वेळेत होऊन शिक्षक पद भरती ही गतिमानतेने होईल."
- शरद शेजवळ, संस्थापक-अध्यक्ष, अध्यापकभारती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.