SAKAL Exclusive : 40 हजार वॉटर बँकेतून कोरडवाहू शेती झाली बागायती! नाशिक जिल्ह्यात शेततळ्याने आणली क्रांती

Latest Agriculture News : जिल्ह्यातील सुमारे दहा तालुक्यात आजमितीस ४० हजाराच्या आसपास शेततळे असून यात डिपॉझिट केलेल्या पाण्यातून सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित पाण्याखाली आले आहे. सर्वाधिक उन्हाळी पिके घेऊन कोट्यवधीची उलाढाल वाढली आहे.
farm water pond
farm water pond esakal
Updated on

येवला : नैसर्गिक विषमतेमुळे दुष्काळी,अवर्षणप्रवण आणि टंचाईग्रस्त ही बिरुदे लाभलेल्या जिल्ह्याला वाटर बँकेने कोरडवाहू हा शिक्का पुसून बागायतदार अशी नवी ओळख देण्याची क्रांती घडविली आहे. जिल्ह्यातील सुमारे दहा तालुक्यात आजमितीस ४० हजाराच्या आसपास शेततळे असून यात डिपॉझिट केलेल्या पाण्यातून सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित पाण्याखाली आले आहे. सर्वाधिक उन्हाळी पिके घेऊन कोट्यवधीची उलाढाल वाढली आहे. (40 thousand water banks helped dryland to farming)

वॉटर बॅंक अर्थात शेततळे दुष्काळी तालुक्याला वरदान ठरल्याने कोरडवाहू शेतीत भाजीपाला, कांदे हे पिके फुलून शेती बागायती होत आहे. उपलब्ध पाण्याची परिस्थिती भयावह होत असल्याने आता टंचाईग्रस्त भागात सर्वच शेतकरी शेततळ्याकडे वळू लागले असून जेथे दिवाळीनतर जमिनी ओसाड पडत होत्या, तेथेच आता हिरवीगार पिके निघू लागली आहे.

किंबहुना येवला, सिन्नर, चांदवड, मालेगाव, देवळा, नांदगाव आदी दुष्काळी तालुक्यात तर गावागावात शेकडो शेततळे तयार झाले आहे. अवर्षणप्रवण भागात डिसेंबर-जानेवारीनंतर लगेच विहिरी, कुपनलिकांचा उपसा सुरू होतो.परिणामी घेतलेली पिके धोक्यात येतात, त्यामुळे शेततळ्यातील पाणी हक्काचे ठरते आणि पीकही निघते.

- कोरडवाहू शेतीत उन्हाळ कांदे

जिल्ह्याचा ६५ टक्के भाग उन्हाळ्यात ओसाड व्हायचा मात्र मागील १५ वर्षापासून शेततळ्याने क्रांती केली असून कोरडवाहू क्षेत्रात आता दुष्काळी तालुक्यातही शेततळ्यामुळे उन्हाळ कांद्यासह इतर उन्हाळी पिके घेता येऊ लागली आहेत, हेच वॉटर बँकेचे मोठे यश आहे.

- एका तळ्यात २ हेक्टरला संरक्षित पाणी

. मालेगाव, सिन्नर, येवला, चांदवड, निफाड, दिंडोरी, नांदगाव आदी तालुक्यात आजमितीला ४० हजारांवर शेततळे शेतकऱ्यांनी साकारले आहेत. यात ३५ ते ४५ हजार एकर क्षेत्र गुंतले आहे. एक तळे २ हेक्टरमधील पिकांना संरक्षित पाणी देते. तळ्यातील पाणी ठिबक तुषारने सिंचनाने दिले जात असल्याने एक तळ्यातून सरासरी एका एकरात सुमारे ३ ते ४ एकराला चार पाणी देणे शक्य होत असल्याचे जाणकार सांगतात.

- दरवर्षी दीड-दोन हजार तळे

राज्य सरकारने २०१६-१७ पासून राज्यात मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली. सातत्याने अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सिंचनासाठी खात्रीशीर पर्याय ठरली आहे.त्यावेळी नाशिक जिल्ह्यांत या योजनेंतर्गत नऊ हजार शेततळे उभारण्याचे उद्दिष्ट असताना जिल्ह्यात विक्रमी ९ हजार ६२३ शेततळी झाली होती.

सुरुवातीला तीन वर्षांत शेततळ्याला जिल्ह्यातील ३५ हजार ८१५ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले होते. पुढे २०२३-२४ मध्ये उद्दिष्ट्य ६०५असतांना २ हजार २१९ शेततळे झाली असून आताही अर्ज करणे व खोदणे सुरूच असून दरवर्षी दीडदोन हजार तळे जिल्ह्यात होतात. या शेततळ्याच्या अनुदानात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (latest marathi news)

farm water pond
MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

"शेततळ्याने जिल्ह्यातील शेतीचा पॅटर्नच बदलवला आहे. पंधरा वर्षांपूर्वी शेततळे खोदणे जिकरीचे मानले जायचे आज मात्र गरज बनली आहे.हजारो हेक्टर क्षेत्र यामुळे पाण्याखाली येऊन जेथे फक्त पावसाळी कोरडवाहू पिके घेतली जायची,तेथेच आज उन्हाळ कांदे आणि भाजीपाला पिके निघत आहेत.पाण्याची काटकसर सुरू झाली पण आपत्कालीन परिस्थितीत संरक्षित पाण्याचा हक्काचा स्रोत शेतकऱ्यांना मिळू लागला आहे,ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल." - अशोक कुळधर,कृषी अभ्यासक,सायगाव

शेततळ्याला असा येतो खर्च (आकार - ३० × ३० × ३)

- शेततळे खोदकाम - १ ते १.५० लाख

- सपाटीकरण मजुरी - १५ ते २० हजार

- संरक्षक कंपाऊंड - ४० ते ६० हजार

- प्लॅस्टिक कागद - २ ते अडीच लाख

- पाईपलाईन,विजजोडणी व इतर खर्च - ३० ते ५० हजार

शेततळे खोदकाम व प्लॅस्टिक अस्तरीकरणाला मिळणारे अनुदान...

आकारमान - शेततळे - प्लॅस्टिक

१५x १५x ३ - १८६२१- २८२७५

२०×१५×३ - २६७७४ - ३१५९८

२०×२०×३ - ३८४१७ - ४१२१८

२५×२०×३ - ५००६१ - ४९६७१

२५×२५×३ - ६५१९४ - ५८७००

३०×२५×३ - ७५००० - ६७७२८

३०×३०×३ -७५००० - ७५०००

farm water pond
Nashik News : अवकाशातून पडले शास्त्रीय कोरियन उपकरण! अंदरसूलला शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.