SAKAL Exclusive: पूर परिस्थितीत 48 स्थळे असुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नियोजन

flood water
flood wateresakal
Updated on

SAKAL Exclusive : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून दहा ते वीस हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्यास सखल भागात पाणी पोचत असल्याने अशी स्थाने महापालिकेच्या वतीने असुरक्षित घोषित करण्यात आली आहेत.

४८ असुरक्षित स्थळांवरील नागरिकांना पूर परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. (SAKAL Exclusive 48 sites vulnerable in flood situation Planning by Disaster Management Department nashik)

गोदावरी नदीचा शहरातून १९ किलोमीटरचा प्रवास होतो. आसाराम बापू पूल ते नांदूर नाकापर्यंत अधिक लोकसंख्येचा भाग व्यापते.

त्यामुळे पावसाळ्यात वेगाने पाणी सोडल्यास किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पूर्व, पश्चिम, पंचवटी तसेच, सातपूर विभागातील नदी काठच्या निवासी भागात पाणी साचते. या असुरक्षित स्थळांची महापालिकेने निश्चिती केली आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज झाला आहे.

ही आहेत असुरक्षित स्थळे (गोदावरी नदीच्या दोन्ही बाजू)

- पूर्व विभाग- भांडी बाजार, सराफ बाजार, नेहरू चौक, गाडगे महाराज धर्मशाळा परिसर, टाळकुटेश्वर पूल, काझी गढी, म्हसोबा वाडी.

- पश्चिम विभाग- गंगावाडी, जोशी वाडा, घारपुरे घाट, मल्हारखान, सुंदर नारायण मंदिर, रविवार कारंजा, तेली गल्ली, दत्तवाडी, स्वामी नारायण कोट, चित्तपावन संस्था कार्यालय, गायधनी लेन, बालाजी कोट, कापड बाजार, बोहोरपट्टी, दिल्ली दरवाजा, कानडे लेन, पगडबंद लेन, ओकाची लेन, नाव दरवाजा, सोमवार पेठ, तिवंधा, गुलालवाडी, मोदकेश्वर मंदिर.

- पंचवटी विभाग- गोदावरीनगर, गणेशवाडी, श्रद्धा लॉन्स, चतुसंप्रदाय आखाडा, पुरिया रोड, नारोशंकर मंदिर, सरदार चौक, चिंचबन, कबुतर खाना, मखमलाबाद नाका.

- सातपूर विभाग- आनंदवली, संत आसाराम बापू आश्रम.

(नंदिनी नदीच्या दोन्ही बाजू)

- महादेव वाडी, जगताप वाडी, कांबळे वाडी, गौतमनगर, आयटीआय पूल, यमुनानगर, मुंबई नाका.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

flood water
Maharashtra Politics : त्या 12 आमदारांच्या नियुक्तीत 'मोदी' घालणार बिब्बा? जाणून घ्या आत्तापर्यंत काय-काय झालं

आपत्ती व्यवस्थापन विभागाची तयारी

- महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष.
- अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांच्याकडे प्रमुख जबाबदारी.
- पावसाळी गटार तसेच मलजलवाहिन्यांची स्वच्छता.
- झाडांचा विस्तार कमी.
- केबल जॉइंट्स, कंट्रोल पॅनल आणि पोल बॉक्सची देखभाल.
- पालिका मुख्यालयात वर्षभर चोवीस तास कक्ष कार्यान्वित.
- नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक- ०२५३-२५७१८७२/२३१७५०५
- सहा विभागीय कार्यालयांमध्ये क्विक रिस्पॉन्स टीम.
- असुरक्षित, मोडकळीस आलेल्या ११९२२ घरांना नोटीस.
- पूर आश्रयस्थानांची निश्चिती.
- पुरापासून बचावासाठी लाऊड स्पीकर.
- जलतरणपटू, भोसला अॅडव्हेंचर फाउंडेशन, केटीएचएम कॉलेज, आपत्ती व्‍यवस्‍थापन समिती चांदोरीच्या स्वयंसेवकांची मदत.
- रेडिओ, टीव्ही, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशनद्वारे माहिती पोचविली जाणार.

flood water
Maharashtra Politics : आमदार बनसोडे यांनी मंत्रीपद मिळण्यासाठी अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांची भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()