SAKAL Exclusive: सिन्नरच्या पूर्वेकडील दुष्काळ हटणार! वाचा सविस्तर

कुंदेवाडी ते सायळे चारीचे ६० तर खोपडी ते मिरगाव चारीचे ५० टक्के काम पूर्ण
Ongoing work of Devnadi Purchari
Ongoing work of Devnadi Purchariesakal
Updated on

SAKAL Exclusive : तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी दहा वर्षांपूर्वी संकल्पित केलेली कुंदेवाडी ते सायाळे ३४ किलोमीटर अंतराची, तर खोपडी ते मिरगाव ही २८ किलोमीटर अंतराची देवनदी बंदिस्त पूरचारी योजना सध्या प्रगतिपथावर आहे.

यातील सायाळे पर्यंतच्या टप्प्याचे काम ६० टक्क्यांपर्यंत पूर्णत्वास गेले असून मिरगाव टप्प्याचे काम निम्मेपर्यंत झाले आहे. (SAKAL Exclusive 60 percent of Kundewadi to Sayle Chari and 50 percent of Khopdi to Mirgaon Chari are complete in sinnar nashik)हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्यातील पहिली मेन्टेनन्स फ्री योजना म्हणून या योजनेकडे बघितले जाते. बंदिस्त पाइप लाइनच्या माध्यमातून ही योजना साकारण्यात येत आहे. विजेचा खर्च नाही, पाणी उचलण्यासाठी विद्युत पंप नाही. केवळ गुरुत्वाकर्षणाने हे पाणी पूर्व भागात खळाळणार आहे.

या योजनेचा अनुभव गेल्या पावसाळ्यातच पूर्व भागातील जनतेला आला आहे. दोडी शिवारापर्यंत सायाळे टप्प्यासाठी आलेले देवनदीचे पूर पाणी पूर्व भागातील मोठ्या असलेल्या जाम नदीतून वाहिले. कोपरगाव जवळ जामनदी गोदावरीला मिळते.

तिथपर्यंत जामनदी डिसेंबर अखेरपर्यंत खळखळत होती. दोडी, मानोरी, मऱ्हळ, पांगरी, मिठसागरे, पिंपरवाडी, मिरगाव, पाथरे शिवारातून जाम नदी कोपरगाव तालुक्यात देर्डे गावातून पुढे गोदावरी पर्यंत जाते.

गेल्या पावसाळ्यात देवनदीचे पाणी मऱ्हळ शिवारातून पुढे वाहिले होते. कुंदेवाडी पासून निघणाऱ्या सायाळे पूरचारीवर माळवाडी, दातली, भोकणी येथील बंधारे या भागात पाऊस नसतानाही तुडुंब भरले होते.

आता सायाळे टप्प्याचे काम निऱ्हाळे-घोटेवाडी दरम्यान पोचले आहे. त्यामुळे देव नदीच्या पाण्याने पूर्व भागातील सर्वात मोठे असणारे फुलेनगर आणि दुसंगवाडी येथील पाझर तलाव भरून घेणे सहज शक्य होणार आहे.

या दोन्ही तलावांची साठवण क्षमता समृद्धीसाठीच्या खोदकामाने वाढली असून गेल्या तीन वर्षांपासून त्याचा प्रत्यक्ष फायदा परिसरातील शेतीसाठी होत आहे. त्यात पुन्हा देवनदीच्या पाण्याची भर पडणार आहे.

हे दोन्ही तलाव भोजापूर धरणातून निघणाऱ्या पूरचारीवर भरून घेण्याचे नियोजन आहे. देवनदी पुरचारीचा दुसरा टप्पा खोपडी ते मिरगाव दरम्यान असून पंचाळेपर्यंत हे काम पोचले आहे.

देवनदी प्रवाहित झाल्यावर या पाण्याचा लाभ फरदापूर, देवपूर, पंचाळे, पांगरी परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. तर जाम नदीतून येणारे देव नदीचे पाणी मिरगावचा परिसर ओलिताखाली आणणारे ठरल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ongoing work of Devnadi Purchari
NMC Money Land Bank : ‘जिऑग्राफिकल मॅपिंग’मधून लॅण्ड बँकेचे निर्माण

"दोन्ही पूरचाऱ्या बंदिस्त पाइपलाइन स्वरूपात आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल. चाऱ्या बंदिस्त स्वरूपात असल्याने शेतकऱ्याला कुठेही अडचण येणार नाही. शेतातून जाणारी चारी साडेतीन मीटर अंतरापेक्षा अधिक खोलीवर असल्याने मशागतीची कामे विनासायास करता येतील." - अविनाश लोखंडे, निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग)

"पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या योजनेला मंजुरी मिळवली. मधली पाच वर्षे वाया गेली नसती तर तेव्हा दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील पूर्ण भरलेल्या बंधाऱ्यांचे जलपूजन करता आले असते." - माणिकराव कोकाटे, आमदार

कुंदेवाडी - सायाळे पूर कालवा

लांबी : ३४.८० कि.मी.

आरक्षित पाणी : १०५ दलघफू

मंजूर रक्कम ७१ कोटी ६ लाख.

सिंचन क्षेत्र : २४९ हेक्टर (अप्रत्यक्ष सिंचन)

लाभक्षेत्रातील गावे : कुंदेवाडी, गुरेवाडी, हाबेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, खंबाळे, मऱ्हळ खुर्द, महळ बुद्रुक, सुरेगाव, भोकणी, दोडी, मानोरी, कणकोरी, निहाळे, फुलेनगर, घोटेवाडी, कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, देवकौठे.

खोपडी - मिरगाव पूर कालवा

लांबी : २५ किमी

आरक्षित पाणी : ११७ दलघफू

प्रस्तावित रक्कम ५० कोटी.

सिंचन क्षेत्र २४० हेक्टर (अप्रत्यक्ष सिंचन)

लाभक्षेत्रातील गावे - खोपडी बुद्रुक, फर्दापूर, देवपूर, धारणगाव, पंचाळे, शिंदेवाडी, पिंपळगाव, मिठसगार, पिंपरवाडी, पांगरी खुर्द, पांगरी बुद्रुक, मिरगाव, कोळगावमाळ, शहा

Ongoing work of Devnadi Purchari
NMC Water Shortage Plan: विभागनिहाय प्रत्येकी 3 टँकर; पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.