SAKAL Exclusive : नरेगातून मॉडेल स्कूलमध्ये होणार 627 कामे; आतापर्यंत 153 कामांना सुरवात

Sakal Exclusive
Sakal Exclusiveesakal
Updated on

SAKAL Exclusive : पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून नावारूपास येणाऱ्या ‘मॉडेल स्कूल’ साठी जिल्ह्यातील १२६ शाळांची निवड झाली आहे. या शाळांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ६२७ कामे प्रस्तावित करण्यात आली असून यातील १५३ कामांना प्रत्यक्षात सुरवात झाली आहे.

साधारण वर्षभरात कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले आहे. या करिता जिल्हा नियोजन समितीकडून १.६६ कोटींचा निधी देखील प्राप्त झाला आहे. (SAKAL Exclusive 627 works will done in model schools from MGNREGA So far 153 works started nashik news)

जिल्हा परिषदेच्या ‘मॉडेल स्कूल’ साकारण्यास मान्यता दिल्यानंतर शिक्षण विभागाने तालुकानिहाय १२६ शाळांची यासाठी निवड केली. जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण याबाबतचे २२५ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आता या वर्गात शिक्षणाच्या ६ पायऱ्या तसेच FLN, ASAR,NAS व PISA च्या धर्तीवर विद्यार्थी धडे गिरवतील. या शाळांना मनरेगा अंतर्गत १३ प्रकारची कामे मॉडेल स्कूल मध्ये होणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे देखील दिले जाणार आहेत.

या शाळांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील इतर शाळा त्यांचे अनुकरण करतील, असा मुख्य हेतू यामागे आहे. १२६ शाळांमधून यासाठी ६२७ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यातील ३५१ प्रस्ताव प्राप्त झालेले असून ३०९ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

यामधील १५३ कामांना सुरू करण्यात आली आहे. यात, आदिवासी भागातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यात कामे सुरू होण्याचे प्रमाण कमी असून, बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. यासाठी शिक्षण विभागाने तालुकानिहाय संपर्क अधिकारी यांची नेमणूक केली आहे.

मॉडेल स्कूल निर्मितीमध्ये महत्त्वाचे तीन टप्पे

१. भौतिक सुविधा २. शैक्षणिक गुणवत्ता ३. लोकसहभाग

योजनेची उद्दिष्टे : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शाळांची निवड करणे, शालेय भौतिक सुविधांमध्ये वाढ व सुधारणा करणे, शाळांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळांत लोकसहभाग वाढविणे, शालेय वातावरण आनंददायी, बालस्नेही व अध्ययन पूरक करणे, विद्यार्थ्याचा शारीरिक बौद्धिक व मानसिक विकास करणे, शिक्षकांची व्यावसायिक गुणवत्ता वाढविणे

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Sakal Exclusive
Nashik News : द्राक्ष उत्पादकांना हवंय ‘मागेल त्याला क्रॉप कव्हर'; अब्दुल सत्तारांकडे मागणी

नरेगा अंतर्गत शाळांमध्ये होणारी कामे

१) शाळेसाठी किचन शेड बांधणे

२) शाळा इमारतीसाठी रेन वॉटर हारवेस्टींग संरचना

३) शाळा परिसरात शोषखडा

४) शाळेसाठी मल्टी युनिट शौचालय

५) शाळेसाठी खेळाचे मैदान

६) शाळेला संरक्षण भिंत (या भिंतीवर विविध प्रकारचे लोकोपयोगी पेंटींग करावयाचे आहे. )

७) वक्ष लागवड

८) आवश्यकतेनुसार शाळेच्या परिसरात पेविंग ब्लॉक

९) शाळेच्या परिसरात बाहेर कॉक्रिट नाली बांधकाम

१०) शाळेकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे

११) बोअरवेल पुनर्भरण (शाळेत बोअरवेल असल्यास)

१२) गांडूळ खत प्रकल्प ( यामध्ये तयार होणारे गांडूळखत शाळेच्या परिसरातील झाडांसाठी वापरता येईल, तसेच माध्यांन्य भोजनातून उरलेल्या शिळ्या अन्नाचा उपयोजन यासाठी आपणांस करता येईल. )

मार्च अखेर प्राप्त झालेले प्रस्ताव, मंजूर कामे व सुरू झालेली कामे

तालुका शाळांची संख्या----प्रस्ताव प्राप्त (कामांची संख्या)----मंजूर कामे----सुरू झालेली कामे

त्र्यंबकेश्वर १० ११ ११ ०

दिंडोरी १० २० २० १

पेठ ८ १४ २ १

नाशिक ७ ८ ७ १

चांदवड ५ २० १४ २

नांदगाव ७ १५ ४ ४

कळवण ९ २५ २५ ५

मालेगाव १० ३० ३० ५

येवला ८ १२ १२ ६

सिन्नर ६ २४ २४ ९

देवळा ६ ११ ११ ११

निफाड ९ २९ २७ १४

इगतपुरी १० २९ २९ २८

सुरगाणा १० ३३ ३३ ३३

बागलाण ११ ७० ७० ३३

Sakal Exclusive
Inflation : कुटुंबाच्या बचतीवर महागाईची कुऱ्हाड; मासिक फॅमिली बजेट वाढीने होतेय कसरत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.