SAKAL Exclusive : उतरला प्रवासी कि घेरला..! प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षावाल्यांची बळजबरी अन अरेरावी

A rickshaw parked directly at the City Link bus stop at Shalimar Chowk
A rickshaw parked directly at the City Link bus stop at Shalimar Chowkesakal
Updated on

SAKAL Exclusive : प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे शहराच्या प्रवेशद्वारांवरील बसथांबे सध्या गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनले आहेत. बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांना नियोजित स्थानकावर उतरल्यानंतर रिक्षाचालक घेरतात.

कुठे जायचे याची विचारणा करत चालक सांगतील त्याच रिक्षाने व मनमानी पद्धतीने आकारलेले भाडे लादून प्रवास करायला भाग पाडतात. एखाद्याला भाडे व रिक्षाचालकांची वागणूक आवडली नाही, तर त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव होतो.

राज्य परिवहन महामंडळाच्या विविध बसथांब्यावर दिसत असलेले हे नेहमीचे चित्र आहे. (SAKAL Exclusive coercion of rickshaw drivers to get passengers atrocious nashik news)

विशेषत: द्वारका चौकातील सर्व्हिस रोडवर टाकळी फाट्याच्या बाजूने हे चित्र नेहमीचे दिसते. येथून शहराच्या चारही बाजूंना प्रवास करणे सोपे आहे. त्यामुळे कसमादेनासह खान्देश, गुजरात व मध्य प्रदेशातून येणाऱ्या बसेसना येथे थांबा आहे.

येथे प्रवाशांऐवजी रिक्षा चालकच बसेसची वाट पाहतात. बसमधून प्रवासी उतरताच तीन ते चार चालक त्यांच्यावर अक्षरश: चाल करून जातात. प्रवाशांच्या मर्जीचा विचार न करता, त्याला रिक्षातूनच इच्छित स्थळी जाण्यास भाग पाडतात.

तेथे प्रवाशाला भाडे परवडेल की नाही, याचादेखील विचार या प्रकारांमध्ये होत नाही. बस चालकांनी जागेवर बस न थांबविल्यास प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. याचीच प्रचिती रविवारी (ता. २३) येऊन बोईसर- नाशिक बसचालकाने थांब्यापासून पुढे बस थांबविली म्हणून चालकासह महिला प्रवाशांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A rickshaw parked directly at the City Link bus stop at Shalimar Chowk
Nashik News : टॅंकर मंजूर, पण डिझेलसाठी निधीच नाही! मंजूर टॅंकरची केविलवाणी स्थिती

येथे होते प्रवाशांची कोंडी

* द्वारका चौक : सर्व्हिस रोडची टाकळी फाटा बाजू, कसारा-घोटी खासगी प्रवासी वाहतुक स्टॅण्ड, पेट्रोल पंप.
* नाशिक रोड रेल्वे स्थानक
* शिवाजी पुतळा चौक, नाशिक रोड
* पाथर्डी फाटा व गरवारे चौक
* पेठ रोड कॉर्नर, दिंडोरी रोड
* सीबीएस व ठक्कर बझार

"रिक्षाचालक बसला एकदम गराडा घालतात. बसमधून खाली उतरणेदेखील अडचणीचे होऊन जाते. शिवाय त्यांच्याकडून जबरदस्ती करत सामानाची ओढताण करतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे." -अरुण इंगळे, प्रवासी.

"रिक्षाचालकांकडून बसमधील प्रवाशांवर आपल्याच रिक्षामध्ये बसण्यासाठी दबाव आणला जातो. त्यासाठी काही विशिष्ट हावभाव केले जातात. त्यातून गैरसमज निर्माण होऊन वाददेखील होतात. नकार देणाऱ्या प्रवाशांशी हुज्जतदेखील घातली जाते. एसटी महामंडळाने बस स्थानकांच्या परिसरात सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी."-इकबाल सय्यद, प्रवासी

"बसथांब्यावर रिक्षाचालकांच्या अतिक्रमाणामुळे नागरिकांचे होणारे हाल बघता प्रशासनाने रीक्षाचालाकंसाठी जे स्वतंत्र थांबे केले आहेत, तिथेच रीक्षा थांबणे सक्तीचे करावे. जेणेकरून सिटीलिंक थांब्यावर रीक्षाचालकांची अरेरावी बंद होईल व सर्वसामान्य नागरिकांना सिटी लिंक बसची सेवा ही सोयीस्कर रित्या उपलब्ध होईल." -शिल्पा सोनार.

A rickshaw parked directly at the City Link bus stop at Shalimar Chowk
Nashik: वातावरणामुळे मंदावले रसवंतीगृहातील घुंगरांचे आवाज! अवकाळीच्या शक्यतेने हंगामी व्यवसायांवर परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.