SAKAL Exclusive : कॉम्रेड श्रीपाद डांगेंच्या मालमत्तेचा वाद Cold Storageमध्ये!

सरदार राजोळेंचे वंशज अन् डांगेंच्या नातीचा अर्ज लालफितीत फाइलबंद
Historical Sarkarwada Gadhi on the banks of Godavari at Karanjgaon (Niphad).
Historical Sarkarwada Gadhi on the banks of Godavari at Karanjgaon (Niphad).esakal
Updated on

नाशिक : भारतीय कामगार आणि कम्युनिस्ट चळवळीतील अध्वर्यू, ब्रिटिश राजवटीमध्ये तेरा वर्ष तुरुंगवास भोगलेले अन् संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत मोठे योगदान देणारे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या मालमत्तेचा वाद सरकारी यंत्रणेने ‘कोल्ड स्टोअरेजमध्ये टाकून दिलायं.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असलेल्या करंजगाव (ता. निफाड) येथील सरकारवाडाशी (गढी) निगडित असलेल्या सरदार सटवाजी राजोळे यांचे वंशज भाऊसाहेब राजोळे आणि डांगे यांची नात संध्या अडवानी यांनी मालमत्तेसंबंधीचे दिलेले अर्ज लालफितीच्या कारभारात फाइलबंद ठेवण्यात आलेत. (SAKAL Exclusive Comrade Shripad Dange Property Dispute Descendants of Sardar Rajole application of relatives of Danges filed waited nashik news)

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डांगे कुटुंबातील वारसांचा सन्मान नाशिक जिल्हा परिषदेत २९ जुलै २०२२ ला झाला. त्याबद्दल संध्या अडवानी यांनी प्रशासन आणि सरकारचे आभार मानले.

या कार्यक्रमानंतर त्या करंजगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या होत्या. त्या वेळी आपल्या करंजगावमधील मालमत्तेवर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून निफाडच्या भूमिअभिलेख कार्यालयातर्फे वारसाची नोंद केली आहे, असा तक्रार अर्ज त्यांनी ३० जुलै २०२२ ला नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

त्याची प्रत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, ग्रामपंचायतीला पाठवून त्यासोबत फेरफारीची नोंद जोडली. भूमिअभिलेख अपील निर्णय, निफाड भूमिअभिलेखचे उपअधीक्षक यांच्याकडील फेरचौकशीच्या निर्णयाप्रमाणे अपील मान्य करून वारस नोंद केल्याने प्रशासनाची दिशाभूल झाल्याचे संध्या अडवानी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Historical Sarkarwada Gadhi on the banks of Godavari at Karanjgaon (Niphad).
CM Fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम पुन्हा सुरू; तरुणांना या तारखेपर्यंत अर्ज करता येणार

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राजोळेंचा अर्ज

ऐतिहासिक सरकारवाडा तथा सरदार राजोळे गढीचे संवर्धनासाठी करंजगाव ग्रामपंचायतीच्या ताब्यात देऊन स्वातंत्र्यवीरांचे स्मारक उभारण्याची मागणी करणारा अर्ज सरदार सटवाजी राजोळे यांचे दहावे वंशज भाऊसाहेब राजोळे यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्हा प्रशासनाला दिला.

ऐतिहासिक वास्तूवर नमूद केलेली नावे वगळून संबंधितांविरुद्ध देशद्रोही फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्यासंबंधीचे आदेश विशेष ग्रामसभा घेऊन द्यावेत, अशी मागणी श्री. राजोळे यांनी केली आहे.

ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या सरदार माधवराव राजोळे यांच्या सरकारवाड्यातील मानकरी आणि स्वातंत्र्यवीर घराणे राजोळे, गायकवाड, पवार, शिंदे, हिंगणे, पळशीकर, जाधव, भगुरे, पगार, वल्टे, टिळे, भागवत, ढमडेरे, डांगे, डांगळे, निरभवणे, उन्हवणे यांची नोंद करंजगाव ग्रामपंचायत दप्तरी व्हावी, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Historical Sarkarwada Gadhi on the banks of Godavari at Karanjgaon (Niphad).
Rickshaw Beauty Competition : सौंदर्य स्पर्धेत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम

महसूल-ग्रामविकासची टोलवाटोलवी

कॉम्रेड डांगेंच्या नातीसह राजोळेंचे अर्ज महसूलकडे दाखल झाले. त्यानुसार महसूलकडून ग्रामविकासाला सूचना देण्यात आल्या. मात्र या दोन्ही विभागाकडून टोलवाटोलवीचे सत्र अवलंबले गेले.

अर्ज करून सात महिने लोटले, तरीही त्याबद्दल नेमकी काय कार्यवाही झाली याचे उत्तर देण्याची तसदी यंत्रणेने घेतली नाही. उलटपक्षी मालमत्तेविषयीचा हा विषय महसूलशी निगडित असल्याचे सांगून ग्रामविकास विभागाने हात वर केले आहेत.

ऐतिहासिक संदर्भ

- १७४५ मध्ये सरकारवाड्याची दोन एकरांत उभारणी
- १७५३-५४ मध्ये सरदार मल्हारराव होळकर यांनी चांदवड परगाण्यातील १४० गावे आणि संगमनेर परगाण्यातील ४० गावांची सैन्यभरती सरकारवाड्यातून केली
- अहिल्याबाई होळकर, माधवराव पेशवे, रघुनाथराव पेशवे यांनी
सरकारवाड्याला भेट दिल्याची दप्तरी नोंद

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Historical Sarkarwada Gadhi on the banks of Godavari at Karanjgaon (Niphad).
Scholarship Exam : राज्यातील 9 लाख विद्यार्थ्यांची रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा

"जागेची कागदपत्रे सरकारकडे असताना ऐतिहासिक सरकारवाडा-गढीवर नवीन वारसांची नोंद लागली कशी, हा प्रश्‍न आहे. आम्हाला ही जागा नको. जागेचा उपयोग संग्रहालय करण्यासाठी व्हावा, यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ही जागा पुरातत्त्व विभाग अथवा ग्रामपंचायतीला देऊन तेथे स्मारक व्हावे. गावाचा विकास व्हावा, ही आमची अपेक्षा आहे."

- भाऊसाहेब राजोळे, सरदार राजोळेंचे दहावे वंशज

"देशाचे नेते म्हणून सर्वपक्षीय नेते आजही कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना मानतात. आमच्या करंजगाव येथील सरकारवाड्यात-गढीत माझ्या आजोबांचे स्मारक उभे राहावे, अशी आमची इच्छा आहे. नाशिक जिल्हा परिषदेतर्फे आमचा सत्कार झाला. त्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्मारकासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले होते. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्व एकत्र आल्यास हे शक्य होईल."- संध्या अडवानी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची नात

Historical Sarkarwada Gadhi on the banks of Godavari at Karanjgaon (Niphad).
Nutrition Allowance Increase : शाळांमधील स्वयंपाकीच्या मानधनात 1 हजाराची वाढ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.