SAKAL Exclusive : गडावर 2 स्वतंत्र मार्गांचा विचार; 4 रोप वे करण्याचे नियोजन

saptashrungi Devi News
saptashrungi Devi Newsesakal
Updated on

नाशिक : वर्षाला चैत्र पौर्णिमा, नवरात्रोत्सव, कोजागरी आणि श्रावण अशा वर्षभरात ७० ते ७५ लाखांहून अधिक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वणी येथील सप्तशृंग गडावर ये-जा करण्यासाठी समांतर रस्ताही नाही. ज्या वणी गावाच्या नावावरून गडाची ओळख आहे, त्या वणी गावातून गडावर जाण्यासाठी रस्ता असावा, अशा मागणीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत आहे. (SAKAL Exclusive Consideration of 2 separate routes to saptashrungi gad Planning of 4 rope way Nashik News)

सप्तशृंगगडावर भाविकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून तरी समांतर दोन रस्त्यांची गरज आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच असा विचार सुरू झाला आहे. प्रमुख आद्यपीठ असलेल्या वणी येथील गडावर चैत्रोत्सवात दहा लाख, शारदीय नवरात्रोत्सव पाच लाख, कोजागरी दोन ते अडीच लाख आणि श्रावणात आठ ते दहा लाख असे ७५ लाखांहून अधिक भाविक दर्शन घेतात. बैठकीत गर्दी नियंत्रणासारखा गंभीर विषय प्रथमच ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळाले.

एकमेव रस्ता दरडीचा

गडावर ये-जा करण्यासाठी भाविकांना नांदूर गावातून एकमेव रस्ता आहे. मात्र या एकमेव रस्त्यावर पावसाळ्यात अनेक भागांत दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. गडाच्या मूळ ढाचाच्या ढासाळण्यामुळे गडावर ये-जा करण्याच्या एकमेव रस्त्यावरील दरडीचा धोका म्हणजे, लाखो भाविकांच्या सुरक्षेशी खेळच आहे. त्यामुळेच प्रवासी संरक्षणासाठी वणी गावातून रस्ता करण्याची गरज आहे. या सगळ्यांत चार रोप वे करावेत, असे बांधकाम विभागाचे नियोजन आहे. मात्र, त्यात गडाच्या मूळ ढाच्या संदर्भातील कामापूर्वी व कामानंतर तज्ज्ञ सल्लागार संस्थांचे अहवाल हा कळीचा मुद्दा आहे.

कुंडाचे पुनरुज्जीवन

सप्तशृंगगडावर १०१ पैकी ४० कुंड जिवंत असल्याने उर्वरित ६८ कुंडाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. गडावरील जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याच्या या प्रयत्नांचा भाग म्हणून ही कुंड विकसित करण्यात येणार आहेत. गडावरील जैवविविधता जपण्यासह तेथील जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न म्हणून पारंपरिक कुंडातील जलस्रोत जिवंत केले जाणार आहेत. तसेच नक्षत्र उद्यानाची संकल्पनाही राबविली जाणार आहे.

saptashrungi Devi News
Nashik Crime News : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग; 3 वर्षांचा सश्रम तुरुंगवास

यापूर्वीच बालोद्यानासाठी काही निधी मंजूर आहे. मात्र त्यावर स्थगिती असल्याने नैसर्गिक पर्यावरणाला धक्का न लागता उद्यान होणार आहे. तसेच सप्तशृंगगड दुर्मिळ वनस्पतीसाठी प्रख्यात आहे. ज्या दुर्मिळ वनस्पती इतरत्र सापडत नाहीत, अशा वनस्पती सप्तशृंगगड, मार्केंडय पर्वतासह पंचक्रोशीत सापडतात. त्यामुळे अशा दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजाती टिकविण्यासारखा उपक्रम गडावर राबविण्याचे विचाराधीन आहे.

पाण्याचे नियोजन

नांदूर गावात असलेल्या प्रचलित तलावाची उंची वाढवून पाण्याची साठवण क्षमता वाढविताना गडावर भाविकांसाठी नवीन पाणीयोजना राबविली जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना होणार आहे. नवीन पाणीयोजना जलकुंडाचा विकास आणि नांदूर गावातील तलावाची उंची वाढवून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याच्या या प्रयत्नांसोबत गडावरून वीस किलोमीटर दूरच्या धरणातून आणण्याच्या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे. भाविकांसाठी पाणी, वीज, रस्ते, शौचालय अशा प्राथमिक सुविधांचा आराखडा तयार केला जाणार आहे. दीड कोटीचा मलनिस्सारण केंद्र उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करून फेरवापर करण्याचे नियोजन आहे.

"सप्तशृंगगडावर भाविकांच्या सोयीसाठी शौचालय, प्रदक्षिणा मार्ग, कुंडांचे पुनरुज्जीवन, उद्यान, बस व पोलिस ठाणे एवढ्या सोयी करण्याचे नियोजित आहे." -गंगाथरन डी., जिल्हाधिकारी

saptashrungi Devi News
Satpur Extortion Case : भाजप महिला नगरसेवक पुत्र नागरेवर वर्षभरात तिसरा हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.