SAKAL Exclusive : 3 तपांपासून अभ्यासक्रम ‘जैसे थे’; नागरी संरक्षण दलाच्या अभ्यासक्रमाची स्थिती

Sakal Exclusive
Sakal Exclusiveesakal
Updated on

नाशिक : पस्तीत ते चाळीस वर्षांत शहरीकरण वाढले, युद्धाचे आणि नैसर्गिक नागरी आपत्तीचे स्वरूप बदलले, पण या सगळ्यांबाबत जनमाणसांत प्रबोधन करण्याच्या नागरी संरक्षण दलाच्या पारंपरिक अभ्यासक्रमात मात्र तसूभरही बदल झाला नाही. आपत्ती व्यवस्थापन केंद्रित अद्ययावत प्रशिक्षणाची गरज वाढली असतानाही नागरी संरक्षण दलाचा अभ्यासक्रम मात्र ‘जैसे थे’च आहे. (SAKAL Exclusive Curriculum of Civil Defence Force Course not changed in 30 40 years nashik news)

देशात युद्ध झाले, तर अशा आपत्कालीन स्थितीत सामान्य नागरिकांच्या जिवाची तसेच मालमत्तेची हानी टाळून त्यांचे मनोधैर्य राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी नागरी संरक्षण दलाची स्थापना झाली. अनेक युद्धांच्या काळात या दलाने व्यापक स्वरूपाची भूमिका वठविली.

युद्धकाळात भोंगे वाजविण्यापासून तर सुरक्षित जागी स्वत:ला कोंडून घेण्यापासून तर लोकांना प्रथमोपचार करून सुरक्षितस्थळी पोचविण्यासाठी तसेच, हॉट लाइनचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम या विभागातर्फे चालविले जातात. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कामकाज चालणाऱ्या या विभागातर्फे दर वर्षी तरुणांना सामान्य प्रशिक्षण, प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी शासनाकडून पाठ्यवेतनही दिले जाते.

यंदा एक हजार २०० जणांचे प्रशिक्षण

प्राथमिक प्रशिक्षणानंतर त्यातील चांगल्या स्वयंसेवकांना मुंबईत अद्ययावत प्रशिक्षण देण्याची सोय आहे. यंदा दहा महिन्यांत सुमारे एक हजार २४८ स्वयंसेवकांना नाशिक केंद्रातर्फे प्रशिक्षण दिले गेले. त्यात ११८ जणांची पुनर्नोंदणी, तर एक हजार १३० नव्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले गेले. याशिवाय ३२४ छात्रसेनेच्या कॅडेटला प्रशिक्षण दिले गेले. शहरातील विभागनिहाय (वॉर्डन) नेमण्यासह महाविद्यालयात जाऊन प्रशिक्षणाची सोय आहे. सध्या युद्धजन्‍य स्थिती नसल्याने प्रथमोपचारासह इतर मूलभूत व पारंपरिक स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

Sakal Exclusive
SAKAL Exclusive : शहरात अनधिकृत मोबाईल टॉवरचा सुळसुळाट

घिसापिटा अभ्यासक्रम

पन्नास वर्षांत नागरी संरक्षण दलाचा अभ्यासक्रम बदललेला नाही. युद्धजन्य स्थितीत सक्रिय असणाऱ्या या विभागात नव्याने बदललेले युद्धाचे स्वरूप व त्यावरील उपाययोजनांचा समावेश नाही. कालौघात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. मात्र येथे आजही ब्रिटिशकालीन युद्धातील बाँबच्या प्रतिकृतीवर आधारित प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबईत इमारतीचे कामकाज सुरू असल्याने अद्ययावत प्रशिक्षणाचे वर्गही बंद आहेत. नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रशिक्षणार्थींची राहण्याची सोय नसल्याने कुणी जात नाही. क्षेपणास्त्र आणि जैविक हल्ल्यापासून तर सायबर हल्ल्यापर्यंतचे नवनवे युद्धाचे स्वरूप बदलत असताना पस्तीत ते चाळीस वर्षांपासून नागरी संरक्षण दलाच्या अभ्यासक्रमात मात्र अद्ययावता आणली गेलेली नाही.

आपत्ती नियंत्रणाला महत्त्व

पन्नास वर्षांपूर्वी पाच मजली इमारती होत्या, सध्या नाशिकला दहा ते बारा मजली इमारतींना परवानगी दिली जात आहे. आगीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. आगीचे प्रकार वाढले आहेत. सगळ्याच आगी केवळ पाण्याने विझवल्या जात नाहीत. फोमसह इतर वायुरूप प्रतिबंधकांचा वापर होतो. मात्र नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना यातील कुठलेही अद्ययावत प्रशिक्षण देण्याची सोय नाही. किंबहुना युद्धाचे, नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप बदलत असताना त्यातील प्रशिक्षणात मात्र आधुनिकता आलेली नाही.

"युद्धाचे स्वरूप बदलले आहे. आपत्तीचे स्वरूप बदलले असले तरी, प्रथमोपचाराच्या पद्धती कायम आहेत. मूलभूत प्रथमोपचार कसे करावेत, याचे प्रशिक्षण दिले जात आहे. भोंगे, हॉटलाइनसह अनेक बाबींविषयी सामान्य तरुणांमध्ये माहिती नाही. हेही वास्तव आहे. "
- देवेंद्र बावस्कर, उपनियंत्रण अधिकारी, नागरी संरक्षण दल

Sakal Exclusive
NMC : शालाबाह्य मुलांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण; विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेची बाब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.