SAKAL Exclusive : प्रत्येक शाळेत ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ उपक्रम! गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आवाहन

Nashik News : येत्या १५ एप्रिलपर्यंत हा उपक्रम राबविण्याचे सर्व शाळांना आदेश देण्यात आले आहेत.
ZP Marathi School
ZP Marathi Schoolesakal
Updated on

इगतपुरी : येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशाचा टक्का वाढावा, यासाठी येत्या मंगळवार (ता. ९) पासून म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नाशिक जिल्ह्यात प्रत्येक गावात व प्रत्येक शाळेत शिक्षणाची गुढी उभारुन ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव व इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी केले आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत हा उपक्रम राबविण्याचे सर्व शाळांना आदेश देण्यात आले आहेत. (SAKAL Exclusive Increase Enrollment initiative in every marathi school news)

आजच्या काळात सरकारी शाळा म्हटले की, समस्यांचे माहेरघर आणि त्यातल्या त्यात जिल्हा परिषदेची शाळा असेल तर मग सगळेच आलबेल अशी एक समाज भावना आहे. मात्र, हे आता फक्त म्हणण्यापुरतेच राहिले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना टक्कर देऊन आता मराठी शाळा मोठी कामगिरी बजावत आहे.

इंग्रजी शाळांची प्रत्येक गोष्टीची सक्ती आणि पालकांच्या परिस्थितीचा विचार न करता होणारी हेळसांड बघता राज्यभरात हजारो विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सोडून जिल्हा परिषद शाळांमधे दाखल झाले आहेत.

याबरोबरच पालकांमध्ये असलेले इंग्रजी माध्यमाचे आकर्षण व इतर काही बाबींमुळे काही वर्षांपूर्वी मराठी शाळांचा पट कमी होताना दिसून येत होता. मात्र, मागील काही वर्षात डिजिटल शाळा, कृतियुक्त अध्ययन-अध्यापन, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या व इतर अनेक दर्जेदार उपक्रमांमुळे मराठी शाळांचा पट वाढत चालल्याचे चित्र आहे.

एवढेच नव्हे तर राज्यभरात हजारो विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सोडून जिल्हा परिषद शाळांमधे दाखल झाले आहेत. हीच परंपरा कायम टिकून राहावी, यासाठी ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी दिली.  (latest marathi news)

ZP Marathi School
Bank Holidays April 2024: ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; या आठवड्यात फक्त 3 दिवस बँका राहणार सुरु

गावागावात गृहभेटीचे नियोजन

गेल्या तीन शैक्षणिक सत्रापासून अंगणवाड्या प्राथमिक शाळेशी जोडल्या गेल्या आहेत. यात पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची अंगणवाडीत कशा पद्धतीने शाळापूर्व तयारी करून घ्यायची, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

गावागावात शिक्षणाची गुढी उभारणे, प्रवेश दिंडीचे आयोजन करणे, रांगोळी प्रदर्शन, शाळाप्रवेश जनजागृती, प्रवेशपात्र विद्यार्थी यादी तयार करणे, गावागावात गृहभेटी करुन पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांशी संवाद साधत त्यांनी कोणती जबाबदारी घ्यायची आहे, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

"इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २२३ प्राथमिक शाळा आहेत. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना ‘गुढीपाडवा- प्रवेश वाढवा’ या उपक्रमाचे योग्य नियोजन व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या महत्वाकांक्षी उपक्रमात सर्व भागातील पालक, शिक्षणप्रेमी व शिक्षकांनी सहभागी होऊन हा नावीन्यपूर्ण यशस्वी करावा."

- नीलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी, इगतपुरी

ZP Marathi School
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीने शेतकरी हतबल! मुला-मुलींचे लग्न, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.