SAKAL Exclusive : सुरगाणा-पेठमधून दीड लाखांवर स्‍थलांतर! स्थानिक स्तरावर कामांच्या उपलब्धतेचा अभाव

Migration
Migrationesakal
Updated on

नाशिक : सीमावर्ती आदिवासी भाग गुजरातला जोडण्यासंबंधीचा वाद उफाळल्यानंतर आदिवासी-शेतकऱ्यांचा लाँग मार्च झाला. त्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. मात्र स्थानिक स्तरावर रोजगाराची उपलब्धता नसल्याने मार्च संपता संपताच सुरगाणा-पेठ या तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी दीड लाखावर आदिवासींचे स्थलांतर झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गुजरातमध्ये बांधकाम-कंपन्यांमधील कुशल कामांसह स्थलांतरित आदिवासी जिल्ह्यातील द्राक्ष मळ्यांपासून पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत पोचले आहेत. (SAKAL Exclusive Migration from Surgana Peth to one half lakhs Lack of availability of jobs at local level nashik news)

मार्चच्या सुरवातीला स्थानिक पातळीवर सरकारी रोजगाराची कामे बऱ्यापैकी सुरू झाली होती. गतवर्षी होळी मार्चच्या अखेरच्या टप्प्यात होती. आता होळीनंतर आदिवासींची पावले रोजगारासाठी गाव, पाड्यांच्या बाहेर पडली आहेत. आता ते अक्षयतृतीयेपर्यंत तेथेच मुक्कामी राहणार आहेत.

गोंदुणे, चिंचले, रघतविहीर, पांगारणे या सुरगाण्यातील पश्‍चिम पट्ट्यात दुग्धोत्पादनातून कुटुंबाला तीन ते चार हजार रुपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यातून तीन ते चार हजार कुटुंबांचे स्थलांतर थांबण्यास मदत झाल्याची आशादायक स्थिती पाहावयास मिळत आहे.

पण अशाही गावातील दहा ते बारा कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतरित झाली आहेत. सुरगाणा तालुक्यातील स्थलांतरणाचे प्रमाण गाव-पाड्यांनुसार ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पोचल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

स्थलांतरची समस्या असलेली गावे

सुरगाणा तालुक्यातील खोबळा, सुळेवांगण, खुंटविहीर, मालगोंडा, पिंपळसोंड, सोनगीर, बोरचोंड, राशा, खेड, काशीशेंबा, पिंपळचोंड, तळपाडा, भदर, गणतुरा, चिंगारपाडा या भागात स्थलांतराची समस्या गंभीर असल्याचे स्थानिक आदिवासी बांधवांनी सांगितले.

पळसन, बुबळी, सालभोये, लाडगाव भागातही हीच समस्या आहे. दुग्धोत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्याने आदिवासी विकास विभागातर्फे तीन हजार कुटुंबीयांना सहा हजार गायी देण्याचा विचार सुरू आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Migration
Nashik News : लग्नसराईने घेतला 45 दिवसांचा ‘ब्रेक’; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प!

त्यासाठी ८५ टक्के अनुदान आणि १५ टक्के रक्कम लाभार्थींची अशी योजना आखण्यात येत आहे. ही स्थिती एकीकडे असली, तरीही सुरगाणा तालुक्यातील स्थलांतराची ठसठस थांबवण्यासाठी नेमक्या काय ठोस उपाययोजना आखल्या जाणार आणि त्याची किती दिवसांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होणार, यावर स्थलांतराचा प्रश्न‍ सुटण्यास मदत होईल.

पेठचा पश्‍चिम पट्टा स्थलांतरग्रस्त

आदिवासी पेठ तालुक्यातील पश्‍चिम पट्टा स्थलांतरग्रस्त झाला आहे. पन्नास हजारांहून अधिक आदिवासींचे स्थलांतर झाल्याचे सांगण्यात आले. जोगमोडी, शिवशेत आंबा, भुवनसह पश्‍चिम भागातून रोजगाराअभावी स्थलांतरण झाले असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदा हे प्रमाण अधिक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मंत्रालयातील काँक्रिटीकरणाचे काम

मुंबईतील मंत्रालयात मधल्या काळात वाहनतळाच्या काँक्रिटीकरणाचे काम झाले. कामानिमित्त मुंबईत गेल्यावर कामावरील काही जणांशी सुरगाणा तालुक्यातील स्थानिकांनी संवाद साधल्यावर राशा भागातील मजूर असल्याचे आढळून आले होते. वलसाडमार्गे हे आदिवासी मजूर राशाहून मुंबईत पोचले होते.

Migration
Nashik Election: नाशिक बाजार समितीत आजी-माजी खासदार आमनेसामने? BJP अन् शिंदे गटाच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.