Staff Selection Exam : Staff Selectionपरीक्षेसाठी नाशिक परीक्षा केंद्राला हुलकावणी

Staff Selection Commission
Staff Selection Commissionesakal
Updated on

Nashik News : स्‍टाफ सिलेक्‍शन कमिशनच्‍या परीक्षेसाठी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्‍या सूचनापत्रातील परीक्षा केंद्राच्‍या यादीतून नाशिकला वगळण्यात आले आहे.

यापूर्वी अनेकवेळा परीक्षा होऊनही यंदा अचानक नाशिकचे नाव वगळल्‍याने उमेदवारांकडून प्रश्‍न उपस्‍थित केला जातो आहे. दरम्‍यान कमिशनच्‍या या अतार्किक निर्णयामुळे जिल्‍हाभरातील उमेदवारांना मुंबई, पुण्यासह जळगावला जाऊन परीक्षा देण्याची वेळ ओढवणार आहे.(Sakal Exclusive News For Staff Selection Exam to ignore Nashik Examination Centre Candidates get tired due to illogical decision Nashik News)

स्‍टाफ सिलेक्‍शन कमिशनतर्फे कम्‍बाईन्‍ड हायर सेकंडरी (१०+२) स्‍तरावरील परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी ८ जूनपर्यंत मुदत दिलेली होती. त्‍यानुसार शहरासह जिल्‍हाभरातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

परंतु अर्ज भरताना नाशिक जिल्ह्यात परीक्षा केंद्रच दाखवत नसल्‍याने या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सविस्‍तर सूचनापत्रकात परीक्षा केंद्रांच्‍या शहरांची यादी शोधली असता, त्‍यातून नाशिक गायब असल्‍याचे काही उमेदवारांच्‍या निदर्शनात आले.

यापूर्वीपर्यंत स्‍टाफ सिलेक्‍शनच्‍या परीक्षा नाशिकमध्ये होत होत्या. परंतु अचानक नाशिक परीक्षा केंद्र वगळण्याचे कारण काय? असा प्रश्‍न उपस्‍थित केला जातो आहे.

प्रश्‍नाला कमिशनकडून असमाधानकारक उत्तर

नाशिक येथील परीक्षा केंद्र वगळल्‍याबाबत विचारणा करण्यासाठी अनेक उमेदवारांनी ई-मेल व पत्र पाठवत स्‍टाफ सिलेक्‍शन कमिशनला विचारणा केली. परंतु कमिशनकडून समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. 'तुम्‍ही अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा व अंतिम मुदतीपर्यंत प्रतीक्षा करू नका' असा प्रतिसाद काही उमेदवारांना प्राप्त झाल्‍याचे समजते.

Staff Selection Commission
Sakal Exclusive : विद्यार्थी हितासाठी पत्नी, पुतणी, भाचीला बनवले मॅडम!

..तर उमेदवारांची होणार दमछाक

सध्याच्‍या सूचनापत्रानुसार महाराष्ट्रात अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्‍हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे या शहरांचा समावेश केलेला आहे.

यापैकी मुंबई व पुण्यात अर्जदार उमेदवारांची संख्या मोठी असते. नोंदणीकृत उमेदवारांना तीन शहरांचे पर्याय नोंदवायचे असून, मुंबई, पुणे किंवा इतर तिसऱ्या पर्यायाची निवड करण्याची वेळ नाशिकच्‍या उमेदवारांवर ओढवली आहे.

ऑगस्‍ट महिन्‍यात ही परीक्षा घेतली जाणार असल्‍याने दुरुस्‍तीसाठी पर्याप्त वेळ उपलब्‍ध आहे. अद्यापही कमिशनने सकारात्‍मक निर्णय घेत नाशिक परीक्षा केंद्र निवडीबाबत सूचनापत्र जारी करत संधी दिली जाऊ शकते. अन्‍यथा परीक्षेला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची दमछाक होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Staff Selection Commission
Nashik Crime: PhonePeद्वारे रक्कम लंपास करणाऱ्या संशयित जेरबंद

यामुळे परीक्षेसाठी नाशिक केंद्र हवेच..

* यादीतील परीक्षा केंद्र नाशिकपासून ४-६ तास अंतरावर

* परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आदल्‍या दिवशी गाठावे लागणार शहर.

* पावसाळ्यात वाहतूक कोंडीच्‍या समस्‍येमुळे परीक्षेपासून मुकण्याची भीती

* लांब केंद्र असल्‍याने जिल्‍ह्‍यातील परीक्षार्थ्यांची संख्या घटण्याची शक्‍यता

* अन्‍य शहरात परीक्षेसाठी जावे लागल्‍याने वेळ व पैशांची होणार नासाडी.

* एकदा नाशिकला वगळल्‍यास भविष्यात कायम वगळले जाण्याची भीती

Staff Selection Commission
Nashik News: संरक्षक भिंत कामासाठी अतिक्रमण हटवा! ‘मेरी’ चे जिल्हाधिकारी, NMC आयुक्तांना साकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.