SAKAL Exclusive : राजकीय अडथळ्यांमुळे रस्ते विकास रखडला! अरुंद रस्त्यांवर वाडे कोसळण्याची भीती

Nashik smart city road development work
Nashik smart city road development workesakal
Updated on

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाण भागात रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत १५. २७ किलोमीटरच्या ५८ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. रस्ते कामांमध्ये मुख्यत्वे करून राजकीय अडथळे असून त्यामुळेच रस्त्यांची कामे पूर्ण होत नाही. त्याचबरोबर तीन ते चार मीटर रुंदीच्या रस्त्यावर कामे करताना अडथळे निर्माण होत असून, त्यातून वाडे कोसळण्याच्या भीतीमुळे पूर्ण क्षमेतेने रस्ते तयार होत नाही. (SAKAL Exclusive Road development stalled due to political obstacles Nashik News)

स्मार्टसिटीअंतर्गत गोदावरी सौंदर्यीकरण व गावठाण विकास ही महत्त्वाची कामे सुरू आहेत. गावठाणात जवळपास १७१ रस्ते कामाचा आराखडा मंजूर आहे. यातील ५८ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्याची कामे करताना राजकीय अडथळे निर्माण होत आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेली कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची ओरड राजकीय प्रतिनिधींकडून होते.

स्मार्टसिटी कंपनीला लक्ष्य करून गेल्या काही दिवसात आंदोलनांची संख्यादेखील वाढली आहे. कुठले ना कुठले निमित्त करून स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून कंपनी बंद करण्याची मागणी होते. परंतु, दुसरीकडे राजकारणी लोकांकडून अडथळे आणले जातात. विशेष करून सराफ बाजार, दहिपूल तसेच मेनरोड भागात रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. बागवानपुरा, खडकाळी, नानावली, कमोद गल्ली आदी भागात कामे करताना लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांना उपठेकेदार म्हणून नियुक्त करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

समस्यांच्या व गुंतागुंतीच्या गावठाण भागातील विकासाची कामे करताना ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले होते. या विरोधात एक दिवस काम बंद आंदोलन केले. त्यानंतर रस्त्यांची कामे सुरू असलेल्या भागात नियमित पेट्रोलिंग आश्‍वासन तत्कालीन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिल्यानंतर काम सुरू झाले.

९७ अरुंद रस्ते

गावठाणातील ७४ रुंद रस्ते व ९७ अरुंद रस्ते आहेत. अरुंद रस्त्यांची रुंदी काही भागात तीन ते चार मीटर असल्याने अशा ठिकाणी काम करताना रस्त्यांवर कामे करताना वाडे पडण्याच्या भीतीमुळे ठेकेदार कंपनीकडून रस्त्यांची संख्या कमी करण्याची मागणी फेटाळण्यात आली.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Nashik smart city road development work
Gram Panchayat Election 2022 : सिन्नरला 12 ग्रामपंचायतीसाठी 82 टक्के मतदान!

या रस्त्यांची कामे झाली पूर्ण (कंसात लांबी मीटरमध्ये)

- अशोक स्तंभ ते रविवार कारंजा (४९८)
- अशोक स्तंभ ते रामवाडी पूल (३०३)
- घारपुरे घाट (४६३)
- निमाणी बस स्टॉप (१०८)
- काट्या मारुती चौक (६४७)
- नाग चौक (१०५)
- महात्मा गांधी रोड (२००)
- पशुवैद्यकीय दवाखाना (२४४)
- मेहेर सिग्नल (५३०)
- गाडगे महाराज धर्मशाळा (४२४)
- अण्णाभाऊ साठे पुतळा (४१८)
- अमरधाम परिसर (७२८)
- मखमलाबाद नाका (३९५)
- अशोक स्तंभ ते जुना गंगापूर नाका (१०००)
- पंचवटी कारंजा (४११)

Nashik smart city road development work
Nashik Crime News : शहरात घरफोड्यांचे सत्र; लाखोंचा ऐवज लंपास!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()