SAKAL Exclusive : Smart City सीसीटीव्हीचा ‘बॅकअप‘ सांभाळणार; पोलिसांची गुन्हेगारी घटनांवर राहणार नजर

Nashik Smart City
Nashik Smart City esakal
Updated on

नाशिक : संपूर्ण शहराची सुरक्षा नजरेच्या टप्प्यात येण्याच्या अनुषंगाने स्मार्टसिटी कंपनीकडून सोसायट्याचा बॅकअप सांभाळला जाणार आहे. तीन ते सहा महिन्यासाठी सांभाळल्या जाणाऱ्या बॅकअपच्या माध्यमातून पोलिसांना गुन्हेगारी घटनांवर नजर ठेवता येणार आहे. (SAKAL Exclusive Smart City will maintain CCTV backup Police will keep eye on criminal incidents nashik news)

संपूर्ण शहर नजरेच्या एका टप्प्यात आणण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीकडून आयटी प्रकल्पांतर्गत शहरात १६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्य शासनाच्या महाआयटी कंपनीकडून त्यात बदल करत सोळाशेऐवजी ८०० कॅमेरे बसवण्याचे निश्चित करण्यात आले.

यामध्ये ३७१ ठिकाणी निश्चित करताना ७१२ फिक्स बॉक्स कॅमेरे, तर ८८.३० झूम कॅमेरे बसविले जाणार आहे. यातही १५९ ठिकाणी २७८ फिक्स बॉस कॅमेरा इतर ३४ ठिकाणी पॉइंट झूम कॅमेरे बसविण्यात आले आहे. मार्च अखेरपर्यंत शहरात आठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होईल.

एकीकडे मुख्य रस्ते व सार्वजनिक भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना दुसरीकडे कॉलनी, सोसायटी व नगरामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेटा सांभाळला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याव्यतिरिक्त बॅकअप सांभाळणे हा खर्चिक भाग असतो. प्रत्येकाला हा खर्च परवडणारा नाही.

त्यामुळे स्मार्टसिटी कंपनी हा बॅकअप सांभाळणार आहे. त्यासाठी स्मार्टसिटी कंपनीने सातपूर एमआयडीसीमधील ईएसडीएस कंपनीसमवेत करार केला आहे. त्याचबरोबर बीएसएनएलच्या मदतीने डाटा कलेक्ट केला जाणार आहे.

Nashik Smart City
Nashik News : सुरगाणा ठरतोय स्ट्रॉबेरी पंढरी! चांगल्या उत्पादनाने आदिवासींचे स्थलांतरही थांबले

सोसायटी किंवा संबंधितांकडून प्रस्ताव

सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे फारसे खर्चिक नाही. परंतु, बॅकअप सांभाळणे खर्चिक असते. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनी सीसीटीव्ही फुटेजचा बॅकअप सांभाळणार आहे. त्यासाठी सोसायटी किंवा संबंधितांकडून प्रस्ताव मागविले जाणार आहे.

तीन ते सहा महिने बॅकअप सांभाळण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी संबंधितांकडून फी घेतली जाईल. परंतु घेतली जाणारी फी किरकोळ स्वरूपाची राहील, अशी माहिती स्मार्टसिटी कंपनीकडून देण्यात आली आहे.

फुटेज सेव्हिंग बँकेचा उपयोग

सरकारी यंत्रणा कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवू शकत नाही. त्याचप्रमाणे पोलिसदेखील शहराच्या प्रत्येक भागात बंदोबस्त पुरवू शकत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना आळा घालणे, नियंत्रण आणणे किंवा लक्ष देण्यासाठी फुटेज सेव्हिंग बँकेचा उपयोग होणार आहे. महापालिकेला कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट किंवा नदी स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठीदेखील उपयोग करता येणार आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Nashik Smart City
TET Result: हौसे- नवसे परीक्षार्थींमुळे टीईटीच्या निकालाचे वाजताय बारा! यंदा निकाल साडेतीन टक्के

असे आहेत फायदे

* स्मार्ट सिटी कंपनीला या माध्यमातून निधी प्राप्त होईल.
* शहरातील सोसायट्याचा एकत्रित डेटा कलेक्शन.
* शहराच्या कानाकोपऱ्यातील गुन्हेगारी घटनांवर लक्ष.
* सोसायट्याचा बॅकअप सेव्हिंगच्या खर्चात कपात.

"स्मार्ट सिटी कंपनी, महापालिका किंवा पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना मुख्य रस्ते वगळता कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शक्य नाही. त्यामुळे सोसायटी, कॉलनी तसेच नगरामध्ये व खासगी ठिकाणी स्वखर्चाने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बॅकअप स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सांभाळला जाणार आहे."

- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी कंपनी.

Nashik Smart City
SAKAL Impact | उपस्थिती भत्ता किमान प्रतिदिन 20 रुपये द्या: धनंजय मुंडेंचे शिक्षणमंत्री केसरकरांना पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()