SAKAL Exclusive : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात; 8 दिवसात संपूर्ण 1 दिवस पाणीपुरवठा बंद

Water scarcity
Water scarcityesakal
Updated on

नाशिक : जून महिन्यात पॅसिफीक समुद्रात ‘अल निनो’ वादळ येणार असल्याने मोसमी पावसाळा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून पाणीकपातीचे प्राथमिक नियोजन करण्यात आले असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कपात लागू होईल. आठ दिवसातून संपूर्ण एक दिवस तर पुढे ऑगस्टपर्यंत परिस्थिती बघून कपात वाढविली जाणार आहे. (SAKAL Exclusive Water cut from first week of April Water supply shut off for 1 whole day in 8 days nashik news)

एप्रिल महिन्यात आठ दिवसातून एकदा, मे महिन्यात दोनदा, जून महिन्यात तीन, तर पुढे अंदाज घेऊन ऑगस्ट महिन्यात आठवड्यातून चार दिवस कपातीचे नियोजन आहे. भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफिक समुद्रात अल निनो वादळाचा अंदाज वर्तविला आहे.

त्याचा परिणाम देशातील मॉन्सून पर्जन्यावर होण्याची दाट शक्यता असून, जून महिन्यानंतरदेखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना कराव्या लागणार आहे. उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटा येण्याचेदेखील शक्यता आहे.

तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास विचारात घेता अचानक पाणीसाठा खालावू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थतीपेक्षा गंभीर होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई कृती आराखडा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना राज्य शासनाने दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार महापालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणी कपातीचे नियोजन केले आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Water scarcity
Success Story : ट्रॅक्टरच्या माध्यमातून रोजगारासह प्रगती! नगाव येथील शेतकरी चतुर पाटील यांची यशोगाथा

कपातीबरोबरच जनजागृती

एप्रिल महिन्यापासून पाणीकपात केली जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कपातीचे नियोजन होईल. आठ दिवसातून एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला जाईल. मे महिन्यात आढावा घेऊन आठ दिवसातून दोनदा, तर त्यानंतर टप्प्याटप्प्याने कपात वाढविली जाणार आहे. पाणीकपात करण्यासाठी महापालिकेकडून जनजागृती केली जाणार आहे.

३१ विहिरींचे जतन

साधारणतः ३१ जुलैपर्यंत धरणात आरक्षित करण्यात आलेले पाणी वापरले जाते. पाऊस लांबणार असल्याने ३१ ऑगस्टपर्यंत नियोजन केले जाणार आहे. महापालिकेच्या ३१ विहीरी स्वच्छ करून आवश्‍यकता भासल्यास पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी पाण्याचा वापर केला जाणार आहे.

त्या व्यतिरिक्त टंचाई वाढल्यास १६० खासगी विहीरी अधिग्रहीत केल्या जाणार आहे. महापालिकेच्या एक हजार १८९ विंधन विहीरी असून, त्यांची दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे. शहराला दररोज साधारण १९ दशलक्ष घनफूट पाण्याचा पुरवठा होतो. टप्प्याटप्प्याने २० ते २५ टक्के पाणी कपात करण्याचे नियोजन आहे.

Water scarcity
Dhule Agriculture News : कोणताही असो वार बाजारात भाव खातेय गवार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.