SAKAL Ganesha Workshop: शाडू मातीपासून बाप्पा साकारा! शनिवारी ‘सकाळ NIE'तर्फे कार्यशाळा

Sakal NIE
Sakal NIESakal
Updated on

SAKAL Ganesha Workshop : शालेय विद्यार्थ्यांमधील कलात्मक गुणांना वाव देण्यासह त्यांच्यातील पर्यावरणविषयक जाणीवा समृद्ध करण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’ (सकाळ-एनआयई) तर्फे यंदाच्या गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी शनिवारी (ता. ९) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नाशिकमध्ये ‘इको गणपती’ कार्यशाळा होईल.

मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील आदर्श माध्यमिक विद्यालयात होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवण्याची कला शिकवण्यात येईल. (SAKAL Ganesha Workshop Create Bappa from Shadu Clay Workshop by Sakal NIE on Saturday nashik)

‘सकाळ इको गणपती’ कार्यशाळेसाठी बालविद्या प्रसारक मंडळ आणि सागर क्लासेसचे सहकार्य लाभले आहे. मुळातच, नाशिकमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ उभी राहिली आहे.

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाडू माती कार्यशाळेच्या ठिकाणी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सोबत पाट, नॅपकिन, बाउल, ब्रश, टूथपिक, कंपासपेटी आणायची आहे.

‘सकाळ एनआयई’ सभासदांना प्रवेश विनामूल्य आहे. कार्यशाळेच्या ठिकाणी ‘सकाळ एनआयई’ ची वार्षिक सभासद नोंदणी उपलब्ध असेल. कार्यशाळेतील सहभागासाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sakal NIE
Sakal NIE : वडिलांच्या स्मरणार्थ वर्षभर ‘सकाळ एनआयई’; केंद्रप्रमुख किशोर रायते यांच्याकडून शाळांना पन्नास अंक भेट

कार्यशाळेत घडवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीची विद्यार्थी आपल्या घरी, शाळांमध्ये प्रतिष्ठापना करून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करू शकतील. त्यातून प्रदूषण रोखण्यास हातभार लागणार आहे.

एवढेच नव्हे, तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजामध्ये पोचण्यास मदत होईल. कार्यशाळेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी आणि सहभाग नोंदणीसाठी मनोहर शिंदे यांच्याशी (९६०४८२८६७२) या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Sakal NIE
Sakal NIE : मोबाईलमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी ‘एनआयई’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.