नांदगाव : नांदगाव तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पहा, गावोगावी पाण्याचे हाल, चाऱ्याची टंचाई, पहिल्या हंगामातील करपलेली पीके, वाया गेलेला हंगाम अन रडकुंडीला आलेला बळीराजा... हे चित्र असण्याचे कारणही तेच प्रथम अल्प पाऊस नंतर पावसाचा मोठा खंड तरीही प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहिले नाही.
स्वतःहून ही स्थिती शासनाला कळविली नाही असे आता समोर आले आहे. याबाबत सकाळने सविस्तर वृत्त देऊनही ताकास तूर लागू न देणारे प्रशासन अखेर राष्र्टवादी कॉंग्रेसचे महेंद्र बोरसे यांच्या उपोषणानंतर बॅकफूटवर आले अने धावाधाव करत नवीन माहिती जमवू लागले आहे. (SAKAL Impact Drought issue hit by careless administration news of Sakal hunger strike of stock exchanges mechanism put in place nashik)
पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस, एकवीस दिवसांपेक्षा जास्त खंड, भूजलपातळीत घट, पीकपेरा व अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट तथा संपूर्ण पिके वाया, चाऱ्याचा गंभीर प्रश्न, पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोताची सद्यःस्थिती, अशा सर्व बाबींचा विचार करून दुष्काळा संदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात येतो.
यात पहिल्या ट्रिगरसाठी राज्यातील १९४ तालुके पात्र ठरल्याने दुसऱ्या ट्रिगरमध्ये तरी नांदगावचा समावेश राहील या समजुतीत प्रशासकीय यंत्रणा गाफील राहिली, मात्र मदत पुनर्वसन विभागाचे पत्र आल्यानंतर ते जागे झाले.
निकषाच्या सर्व कसोट्यांवर शंभर टक्के बसत असूनही दुष्काळाच्या यादीत नांदगावचा समावेश झालाच नाही हे दुर्दैव कुणामुळे आले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आमदार सुहास कांदे यांनी संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोरोनाच्या धर्तीवर एकत्रित येऊन काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या, तेरा ऑक्टोबरला ट्रिगर २ मधील तालुक्यांची नावे जाहीर झाली.
सकाळने सर्वप्रथम हे उघडकीस आणले, मात्र असे काही नाही असा पवित्रा घेणाऱ्या प्रशासनाचे पितळ जेव्हा मदत पुनर्वसन विभागाचे पत्र समोर आले तेव्हा उघडे पडले. प्रत्यक्षात वस्तुस्थिती समोर आली तेव्हा दुष्काळाच्या यादीतून नांदगाव गायब झालेले होते.
रूटीन म्हणून बघणारी यंत्रणा जेव्हा आमदार कांदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल तक्रार केली, तेव्हा यंत्रणा हलू लागली.
याच प्रश्नावर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी मुद्देनिहाय दिलेल्या निवेदनाची सुरुवातीला यंत्रणेने फारसे गांभीर्याने घेतलेच नाही, मात्र महेंद्र बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सूक्ष्म पद्धतीने मुद्देनिहाय प्रशासनाला विचारला करून चांगलीच कोंडी केली.
तेव्हा कुठे आम्ही आमचे काम केले, वरिष्ठांनी काहीच मागितले नाही असा बचावात्मक युक्तिवाद प्रशासनाने केला. दुष्काळाच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण झाले, तेव्हा कुठे चार पावले मागे जाण्याची नामुष्की या सहा दिवसात यंत्रणेवर ओढविली.
सिलेक्टिव्ह दुष्काळ कसा?
दुष्काळासंबधी २०१८ ला गिरीश महाजन पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आठ तालुके महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटर(MRSAC )या संस्थेने
सकारात्मक दाखविले होते. मग सिलेक्टिव्ह दुष्काळ कशाच्या आधारे निघाला याच्या मुळाशी जाण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.