SAKAL Impact News : अन् पादचारी पूल नागरिकांसाठी झाला खुला!; नागरिकांनी मानले आभार

sakal-news-impact
sakal-news-impactesakal
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : शहरातील बुद्ध विहारासमोर असलेल्या मध्य रेल्वेच्या पादचारी पुलाचे डागडुजीचे काम नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करण्यात आले होते. या धिम्या कामामुळे रहिवासी मात्र त्रस्त झाले आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले.

युध्दपातळीवर दिवसरात्र काम सुरू करून गुरुवारपासून (ता.५) हा रेल्वे पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. यामुळे केल्याने विद्यार्थीसह महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले. (SAKAL Impact News pedestrian bridge opened for citizens at igatpuri nashik news)

रेल्वेमार्गामुळे शहराच्या रचनेत दोन भाग पडले असून अर्धा भाग मुख्य बाजारपेठ तर अर्धा भाग हा रेल्वेच्या पलिकडे असल्याने या पादचारी पुलावरुन महामार्गालगत असलेल्या पिंप्रीसदो, नांदगावसदो, फांगुळगव्हान, मानवेढे येथील सर्वसामान्य नागरिकांची मोठी वर्दळ असते.या नागरिकांची सोय होत असल्याने ते याचाच वापर करतात, मात्र प्रशासनाने या पुलाच्या डागडुजीचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरु केले होते.

हे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांना तीनलकडी पुलापर्यंत वळसाघालून ये-जा करावी लागत होती. अनेक नागरिक, शालेय विद्यार्थी व महिलावर्ग जीव घोक्यात घालून रेल्वेच्या खालून जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

या भागातील गावठा, मिलिंदनगर, सह्याद्रीनगर, शिवाजीनगर, पंढरपूरवाडी, शिवनेरी कॉलनी, आठचाळ आदी परिसरातील नागरिकांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला कळविले होते. अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांनाही हा अडचणीबाबत सांगितले. मात्र आमचा कार्यकाळ संपला असे सांगून आपली जबाबदारी झटकाली, याची माहिती प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर ‘सकाळ’ने हा विषय प्रकाशझोतात आणला होता.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

sakal-news-impact
प्रथमोपचारातून पोलिसांना मिळाला Lifelineचा मंत्र; श्री काळाराम देवस्थानाच्या महाआरोग्य शिबिराचा समारोप

"पुलाचे काम सुरु असल्याने मुलांना घेऊन रेल्वेलाईन ओलांडून जावे लागते होते. हा पायी प्रवास करताना फार भीती वाटायची. मात्र ‘सकाळ’ने आमचा प्रश्‍न मांडला आणि प्रशासनाला दखल घ्यावी लागली. पुलाचे काम पुर्ण झाल्याने समाधान वाटते." - रत्नाबाई पगारे, गृहिणी.

"शहरात जाण्यासाठी याच पुलावरुन जावे लागायचे. काम लांबत असल्याने दररोज जीव मुठीत ठेऊन मालगाडीखालून जावे लागते. रेल्वे प्रशासनाने त्वरित दखल घेतल्याने हा पूल पुन्हा सुरु झाला. लोकप्रतिनिधी मात्र याकडे पाहायला तयार नव्हते." - हौसाबाई खरात, गृहिणी.

"शहराकडे जाण्यासाठी वयोवृध्दांना रेल्वे लाईनवरुन जाणे-येणे जिकारीचे झाले होते. अनेकांकडे तक्रारी केल्या, मात्र फक्त बघतो, सांगतो यातच वेळ जात होता. मी ही वय्था दैनिक ‘सकाळ’च्या माध्यमातून बातमीदाराला दिली. बातमी आली अनं.. काम जोमात सुरु झाल्याचे समाधानच वाटले. सकाळचे आभार." - जगनराव यादव, ज्येष्ठ नागरिक.

sakal-news-impact
Nashik News : डॉ. हुसेन रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केंद्र 3 वर्षापासून बंद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.