नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये शहरात महिलांचे सौभाग्यचं लेण दुचाकीवरून येणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांकडून बळजबरीने ओरबाडून नेल्या जात असल्याच्या घटना घडत आहेत, तर सिडकोतील खुटवडनगर भागात एकाच चौकात सलग तीन चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. याची गंभीर दखल घेत अंबड पोलिसांनी कॉलनी रस्त्यांवरही नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे. (SAKAL Impact News Strict Blockade Against Chain Snatchers in cidco nashik Latest Marathi News)
नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये ऐन सणासुदीच्या काळात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरटे ओरबाडून नेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांकडून शहरभर नाकाबंदीचा दावा केला जात असतानाही सोनसाखळी चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान कायम होते. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतही सोनसाखळ्या खेचून नेण्याच्या घटना घडल्या. प्रामुख्याने खुटवडनगर भागातील वृंदावननगर येथे एकाच चौकात चार-पाच दिवसांत तीन चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. याची गांभीर्याने दखल अंबड पोलिसांनी घेतली.
अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड हद्दीतील कॉलनी रस्त्यांवरही पोलिसांची गस्त वाढविली आहे. तसेच चौकांच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयास्पद वावरणाऱ्या वाहनचालकांची चौकशी केली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पुरुष व महिला पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, रात्री पोलिस गस्तीचे वाहने कॉलनी रस्त्यांवरूनही फिरत असल्याने ठिकठिकाणी टवाळक्या करणाऱ्या टवाळखोरांचा वावरही कमी झाला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या उपाययोजनांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.