SAKAL Impact News : अखेर ‘त्या’ भिंतीचे भगदाड बुजविले

Blockade of defense wall of Bhadrakali police station with concrete construction.
Blockade of defense wall of Bhadrakali police station with concrete construction.esakal
Updated on

SAKAL Impact News : जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाणे मागील संरक्षण भिंतीस मोठे भगदाड पडले होते. याबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसारित होताच पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेतली. त्वरित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संरक्षण भिंतीचा खड्डा बांधकाम करत बंद करण्याची कारवाई केली. (SAKAL Impact News wall of bhadrakali police station repaired nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Blockade of defense wall of Bhadrakali police station with concrete construction.
Damage Road : कॉलनी रस्ते दुरूस्तीला कधी लागणार मुहूर्त? नागरिकांकडून नाराजी

विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून भिंतीस भगदाड असूनही पोलिसांचे याकडे लक्ष नव्हते. सोमवारी (ता. २४) याबाबत वृत्त ‘सकाळ’ अंकात प्रसिद्ध झाले. पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून वृत्ताची दखल घेण्यात आली.

त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगून दोन्ही संरक्षण भिंतींना पडलेले भगदाड पक्के बांधकाम करून बंद करण्यात आले. यापुढेही अशा घटना घडणार नाही. यासाठी पोलिसांचे विशेषतः मुद्देमाल कारकून की ज्यांच्या ताब्यात आवारात पडून असलेला मुद्देमाल असतो.

त्यांनी वेळोवेळी पाहणी करून मुद्देमाल सुरक्षित असल्याची खात्री करण्यात यावी. जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. सध्या तरी दोन्ही संरक्षण भिंतीचे भगदाड बंद करण्यात आल्याने आवारातील मुद्देमालाचे सुरक्षा वाढण्यास मदत झाली आहे.

पोलिस ठाण्याच्या मागील बाजूसही सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे अशाप्रकारे संरक्षण भिंतीला सुरुंग लावणाऱ्यांचा तपास लागण्यास मदत होईल.

Blockade of defense wall of Bhadrakali police station with concrete construction.
Nashik Holkar Bridge : होळकर पुलाच्या पादचारी मार्गाला भेगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.