नाशिक : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचे प्रस्थ वाढत असल्याने तक्रारी प्राप्त होत आहे मात्र, त्यावर कारवाई होऊन बोगस डॉक्टर सापडत नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ ने प्रसिद्ध केले होते. यानंतरही जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सुस्त होता.
अखेर यावर कळवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी विधानभवनात वस्तुनिष्ठ प्रश्न उपस्थित केला आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाकडे माहिती मागविण्यात आली आहे.
ही माहिती देण्यासाठी विभागाची धावपळ सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यातील एकावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. (SAKAL Impact presence of ZP health department MLA Rahul Aher Nitin Pawar asked objective question for information to ZP Health Department nashik news)
नाशिक जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागासह गोरगरिबांची वस्ती असलेल्या ठिकाणी बोगस डॉक्टर बस्तान बसवत असल्याचे यापूर्वी उघड झालेले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी बोगस डॉक्टर नसताना डॉक्टर संदर्भात तक्रारी मागविल्या जातात. यानुसार गत तीन वर्षात आरोग्य विभागाकडे ३१ बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
मात्र, तीन वर्षात एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई होऊ शकलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित करत ‘सकाळ’ ने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास सापडेना मुन्नाभाई असे वृत्त प्रसिद्ध केले होते.
त्यानंतर आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, दीड महिना उलटून देखील कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत आता आमदार पवार व डॉ. आहेर यांनी विधानसभेत वस्तुनिष्ठ प्रश्न उपस्थित केला आहे.
हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रश्नांच्या अनुषगांने माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती
बोगस डॉक्टरांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांसह त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव तर जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी आरोग्य हे सदस्य आहेत.
ज्या नागरिकांना बोगस डॉक्टरांबाबत संशय येतो त्यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येते. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करून त्यांवर काय कारवाई केली याबाबतचा अहवाल मागवला जातो.
याबाबत बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत. मात्र अद्याप याबाबत एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे.
आरोग्य विभागाने दिलेली माहिती
२०२० मध्ये प्राप्त तक्रारी (निफाड २, बागलाण १, मालेगाव १)
२०२१ मध्ये प्राप्त तक्रारी (नांदगाव ४, नाशिक १, मालेगाव १, नाशिक मनपा १,)
२०२२ मध्ये प्राप्त तक्रारी (दिंडोरी १, इगतपुरी ७, सिन्नर २, मालेगाव १)
२०२३ मध्ये प्राप्त तक्रारी (नांदगाव १)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.